Guru Vakri 
राशिभविष्य

Guru Vakri: ऑक्टोबर महिन्यात गुरु चालणार वक्री चाल; 'या'राशींच्या व्यक्तींच्या संपत्तीत होणार वाढ

Guru Vakri: ऑक्टोबर महिन्यात गुरू ग्रह वक्री चाल चालणार आहे. यामुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले बदल होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रहाला याठिकाणी विशेष स्थान देण्यात आलं आहे. गुरु शनीच्या नंतरचा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. हा ग्रह एका राशीत सुमारे 1 वर्ष राहतात. गुरू ग्रह वेळोवेळी व्रकी, मार्गी, अस्त आणि उदय होत राहतात.

ज्योतिष शास्त्रानुसार सध्या गुरू, शुक्र, वृषभ राशीमध्ये आहे. ऑक्टोबर महिन्यात गुरू ग्रह वक्री चाल चालणार आहे. यामुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले बदल होणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू 09 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:01 वाजता वृषभ राशीमध्ये वक्री होणार आहे.

कर्क रास (Kark Zodiac)

या राशीच्या अकराव्या घरात गुरु वक्री दिशेला जाणार आहे. या राशीचे लोक नशिबाच्या बाजूने असणार आहेत. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकणार आहेत. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. तुमच्या अनेक प्रलंबित इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या व्यवसायातही भरपूर नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत खुले होऊ शकतात.

मिथुन रास (Mithun Zodiac)

या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. बृहस्पति वक्री असल्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. कुटुंबात सुरू असलेला वाद आता संपुष्टात येऊ शकतो. एखाद्याला दिलेले पैसे तुम्ही परत मिळवू शकता. भाऊ-बहिणींसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.

वृश्चिक रास (Vraschik Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी, गुरू वक्री झाल्याने सर्व सुख दारी येणार आहेत. नोकरी आणि व्यवसायातही चांगली प्रगती बघायला मिळेल. तुमच्या करिअर क्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळू शकणार आहे. तुम्हाला प्रमोशनसोबत पगारातही वाढ होऊ शकते. प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT