Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Malavya Rajyog: नोव्हेंबरमध्ये शुक्र ग्रह बनवणार मालव्य महापुरुष राजयोग, 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

Malavya Rajyog November 2025: नोव्हेंबरमध्ये सुख, संपत्ती आणि सौंदर्याचा कारक ग्रह शुक्र आपल्या स्वराशी तूळ मध्ये प्रवेश करून शक्तिशाली मालव्य महापुरुष राजयोग तयार करत आहे. यामुळे खालील तीन राशींच्या जीवनात मोठे आणि सकारात्मक बदल पाहायला मिळतील.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषात अनेक प्रकारचे राजयोग आणि महापुरुष योग आहेत. ज्यांच्या कुंडलीत हे योग निर्माण होतात त्या व्यक्तीला आयुष्यात सर्व भौतिक सुख, संपत्ती आणि मान-सन्मान प्राप्त होतो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या स्थितीनुसार वेळोवेळी गोचर करत असतात आणि त्यामुळे नवनवीन राजयोग तयार होतात. याचपैकी एक महत्त्वाचा योग म्हणजे मालव्य राजयोग. हा राजयोग जो शुक्र ग्रहाशी संबंधित मानला जातो. येत्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शुक्र ग्रहाच्या गोचरामुळे हा शुभ योग निर्माण होणार आहे.

मालव्य राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार असून त्यांना धनलाभ, प्रतिष्ठा आणि वैभवाची प्राप्ती होऊ शकणार आहे. यावेळी काहींची अडकलेली कामंही पूर्ण होऊ शकणार आहेत. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

धनु रास

मालव्य राजयोगामुळे धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकतो. गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळू शकतो. या काळात अचानक धनलाभाची शक्यता प्रबळ आहे. शेअर बाजार, व्यवसाय किंवा पूर्वीच्या योजनांमधून अप्रत्याशित लाभ मिळण्याची संधी मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग अतिशय शुभ ठरणार आहे. हा योग तुमच्या राशीपासून दहाव्या भावात निर्माण होत असल्यामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना या काळात नवी जबाबदारी आणि बढतीची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल.

तूळ रास

तूळ राशीसाठी मालव्य राजयोग अत्यंत अनुकूल ठरणार आहे. हा योग तुमच्या राशीपासून लग्नभावात तयार होणार असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षण वाढणार आहे. विवाहित लोकांसाठी हा काळ वैवाहिक आनंदाने भरलेला असणार आहे. अविवाहितांना लग्नासाठी योग्य प्रस्ताव मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वंचित बहुजन आघाडीच्या आक्रोश मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारली

आम्ही किंगमेकर आहोत...'; टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांची कारच्या टपावर बसून हुल्लडबाजी; पोलीस काय कारवाई करणार?

Maharashtra Politics: काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे बंधू राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

Karjat Tourism : डोंगर, दऱ्या अन् धबधबे; कर्जतजवळ प्लान करा दिवाळी वीकेंड, 'हे' आहे खास लोकेशन

Gold price : अवघ्या ६ मिनिटात सोनं ७,७०० रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या दरात वर्षभरातील सर्वात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT