February Grah Gochar saam tv
राशिभविष्य

February Grah Gochar: फेब्रुवारीमध्ये ग्रहांचा राजा, सेनापतीसह ४ ग्रह करणार गोचर; 'या' राशींच्या घरी पडणार पैशांचा पाऊस

February 2025 Grah Gochar: फेब्रुवारी 2025 मध्ये सूर्य, मंगळ आणि बुध यासह 4 शक्तिशाली ग्रहांचं गोचर होणार आहे. त्यामुळे सर्व लोकांना नक्कीच काही ना काही फायदा होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह नियमित अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या गोचरमुळे कुणाच्या नशिबाचा तारा उगवतो तर कुणाला नुकसान सहन करावं लागतं. फेब्रुवारी 2025 मध्ये सूर्य, मंगळ आणि बुध यासह 4 शक्तिशाली ग्रहांचं गोचर होणार आहे. त्यामुळे सर्व लोकांना नक्कीच काही ना काही फायदा होणार आहे. विशेष म्हणजे ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध फेब्रुवारीमध्ये दोनदा भ्रमण करणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, 4 फेब्रुवारीपासून फेब्रुवारी 2025 मध्ये ग्रहांचं गोचर सुरू होईल. यानंतर 11 फेब्रुवारीला बुध शनीच्या राशी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्यानंतर ग्शनी देखील सध्या कुंभ राशीत विराजमान असल्याने 11 फेब्रुवारीनंतर त्रिग्रही योगही तयार होणार आहे. याशिवाय मंगळ ग्रह देखील वृषभ राशीत पोहोचणार आहे.

ग्रहांमध्ये सर्वात शेवटी बुध गोचर करणार असून तो बृहस्पतिच्या मीन राशीत पोहोचणार आहे. या चार ग्रहांच्या गोचरमुळे आणि शुभ योगांमुळे फेब्रुवारीमध्ये चार राशींसाठी चांगला काळ सुरू होणार आहे. यावेळी नोकरी आणि व्यवसायात अनपेक्षित प्रगती होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींवर याचा चांगला परिणाम होणार आहे ते पाहूयात.

सिंह रास

फेब्रुवारी 2025 मध्ये या राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होणार आहेत. बॉस त्याच्या कामावर खूश असणार आहे. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. आपण नवीन कार खरेदी करण्याचा निर्णय देखील घेऊ शकता. अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकणार आहे.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी पुढील महिना परिवर्तनाचा असण्याची शक्यता आहे. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचा व्यवसायही वाढवू शकता. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहणार आहेत. कोर्टात सुरू असलेली प्रकरणं तुमच्या बाजूने सुटू शकणार आहेत.

कुंभ रास

कुंभ राशीचे लोक जे बऱ्याच काळापासून स्वतःचा उपक्रम सुरू करण्याचा विचार करत होते. सुरुवातीला थोडा वेळ लागेल पण नंतर तुमचं काम अधिक सोप होणार आहे. तरुणांना चांगली बातमी मिळू शकते. चांगल्या हवामानामुळे तुम्ही कुटुंबासह कुठेतरी फिरायला जाऊ शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : लातूरमध्ये काँग्रेसला धक्का, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेकडे आघाडी

Maharashtra Live News Update: पनवेलमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतमोजणी दरम्यान लाठीचार्ज

ZP election Result : भाजप खासदाराला पराभवाचा धक्का, जिल्हा परिषदेत पत्नीचा दारूण पराभव

Benefits Of Dark Chocolate: डार्क चॉकलेट खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे

Famous Actors: अभिनेता विशाल अन् अक्षयाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT