Surya Gochar  Saam Tv
राशिभविष्य

Surya Gochar: फेब्रुवारीमध्ये तब्बल ३ वेळा सूर्य बदलणार चाल; 'या' राशींच्या इच्छा होणार पूर्ण, पैसा बरसणार

Surya Gochar 2025: एक वर्षानंतर १२ फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय सूर्य 6 फेब्रुवारीला धनिष्ठा नक्षत्रात आणि 19 फेब्रुवारीला शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी फेब्रुवारी महिना हा खूप खास असणार आहे. याचं कारण म्हणजे ग्रहांचा राजा सूर्य तीनदा त्याच्या चालीत बदल करणार आहे. एक वर्षानंतर १२ फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय सूर्य 6 फेब्रुवारीला धनिष्ठा नक्षत्रात आणि 19 फेब्रुवारीला शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

ज्योतिषशास्त्रात सूर्याला विशेष स्थान देण्यात आलं आहे. सूर्य देव हे यश, पिता, आत्मा, उच्च स्थान आणि नेतृत्व इत्यादींचा कारक मानला जातो. कुंडलीत सूर्याची मजबूत स्थिती माणसाला यशाच्या शिखरावर नेऊ शकते. दरम्यान फेब्रुवारीमध्ये होणारं सूर्याचं गोचर काही राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचं हे संक्रमण फायदेशीर ठरू शकणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. या काळात तुम्हाला विवाहाचे प्रस्ताव येतील. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. यावेळी समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहणार आहे.

मेष रास

फेब्रुवारी महिन्यात मेष राशीच्या लोकांवर सूर्यदेवाची विशेष कृपा होणार आहे. नोकरीचा शोध पूर्ण होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायासाठी हा काळ शुभ राहणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढणार आहे. पदोन्नतीची शक्यता आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी 2025 चा दुसरा महिना देखील अनुकूल असणार आहे. स्थानिकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या दूर होणार आहे. यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूही मजबूत असेल. कोर्टाच्या केसेसमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : फ्रिजमध्ये कुठेही काहीही ठेवता? जाणून घ्या कोणत्या रॅकमध्ये काय ठेवावं, नाहीतर होईल नुकसान

Google search safety: गुगलवर कधीही सर्च करू नका 'या' 7 गोष्टी; पडू शकतं महागात

Bigg Boss 20 House: 'बिग बॉस २०'च्या घरात भन्नाट ट्विस्ट; Room 20 आणि 2X मध्ये दडलंय मोठं सीक्रेट

२५ तासांचा एकपात्री नाट्यप्रयोग; ‘मी सावली भीमाची’ नाटकाने रचला विश्वविक्रम

Maharashtra News Live Update: पुणे-सातारा महामार्गावर दोन कारची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

SCROLL FOR NEXT