Horoscope Today 24th July 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : आज संकष्टी चतुर्थी, गणरायाच्या कृपेने तुम्हाला काय फळ मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य

Rashi Bhavishya Today Marathi : आज २४ जुलै २०२४ संकष्टी चतुर्थी गणरायाच्या कृपेने तुम्हाला काय फळ मिळणार? जाणून घ्या राशीभविष्याच्या माध्यमातून...

Anjali Potdar

दैनिक पंचांग - दिनांक - २४ जुलै २०२४

वार - बुधवार. आषाढ कृष्णपक्ष तिथी - तृतिया - ७:३१ प.नंतर संकष्टचतुर्थी. नक्षत्र - शततारका. योग - सौभाग्य. करण - बव. रास - कुंभ. दिनविशेष - क्षयतिथी.

मेष : दिवस छान सुसंधी घेऊन आलाय

आजचा दिवस खूप छान सुसंधी घेऊन आलेला आहे. "जो जे वांछील तो ते लाभो" असा दिवस आहे. मनातील सर्व इच्छा पूर्णत्वाला जातील. नातेवाईकांचे तसेच शेजारच्यांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : राजकीय क्षेत्रात प्रगतीचे योग

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रगतीचे योग आहेत. कामाबरोबर कामाचा आनंदही लुटाल. स्त्री सहकारीची विशेष मदत आज मिळणार आहे. दिवस चांगला राहील.

मिथुन : विशेष गणेश उपासना करा

मोठे प्रवास घडतील. कोणत्याही गोष्टीत अडचणी आल्या तरी त्या गोष्टी सुकर होतील. देवाची उपासना फलदायी ठरेल. आज संकष्टी असल्याने विशेष गणेश उपासना करा. फायदा होईल.

कर्क : वाईट गोष्टीत फसू नका

खाण्यापिण्यावर थोडे कंट्रोल ठेवा. त्याच्यामधून होणारे त्रास आज जाणवतील. मनस्थिती आणि परिस्थिती दोन्ही खूप मनासारख्या नसतील पण आजचा दिवस नेटाने काढावाच लागेल. वाईट गोष्टीत फसू नका.

सिंह : कामामध्ये यश मिळेल

विनाकारण आपल्यावर आलेले बालंट सहजरीत्या पलटवून लावाल. आपली स्वतःची अस्मिता ओळखून वागावे लागेल. व्यावसायिक जोडीदाराचे योग्य ते सहकार्य मिळाल्याने कामामध्ये यश मिळेल.

कन्या : गुप्तशत्रूंवर मात कराल

पोटाचे दुखणे आणि तक्रारी सतवतील. बाहेरचे खाणे आणि पाण्यापासून स्वतःला जपा. गुप्तशत्रूंवर मात कराल. नोकर, चाकर यांच्यापासून सावधानगिरी बाळगा.

तूळ : गणेश उपासना फलित देणारी

आज विशेष गणेश उपासना फलित देणारी ठरणार आहे. दर्शन घ्या.जप जास्तीत जास्त करा. संतती सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. शेअर बाजार व तत्सम धनविषयक निर्णय आज योग्य ठरतील.

वृश्चिक : समजूतदारपणे वागावे लागेल

ठरवून सुद्धा खूप गोष्टी मनासारख्या होत नाहीत असे वाटेल. कुटुंबीयांशी आज आपल्याला समजूतदारपणे वागावे लागेल. सर्व करून परत "पालथ्या घडावर पाणी" अशी अवस्था येऊ शकते. काळजी घ्या.

धनु : स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास वाटेल

लेखक व लेखन प्रवासासाठी आजचा दिवस चांगला असेल. नवीन प्रकाशाच्या गोष्टी हातून सहज घडतील. छोटे प्रवास घडतील. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास वाटेल.

मकर : घरातील लोकांना समजून घ्या

जुन्या गोष्टी उगाच उकळून काढण्यात काही फायदा नाही. आज "मनस्थिती ठीक नसेल तरी परिस्थिती ठीक ठेवण्याचा प्रयत्न करा". घरातील लोकांना समजून घ्या. सर्वांबरोबर दिवस आनंदात जाईल याचा प्रयत्न करा.

कुंभ : यशस्वी दिवसाची वाटचाल कराल

आरोग्य छान राहील. आत्मविश्वास आणि सकारात्मकता दोन्ही गोष्टी आज वाढणार आहेत. आळस झटकून कामाला लागाल. यशस्वी दिवसाची वाटचाल कराल .

मीन : मनस्तापाचा दिवस आहे

विनाकारण ताण, त्रास आणि मनस्तापाचा दिवस आहे. तब्येती साठी सुध्दा विनाकारण खर्च होईल असे दिसते आहे. मनस्थिती जपा. उपासना फायदेशीर ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT