Rashi Bhavishya 15th July 2024  Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today : आजचे राशीभविष्य, या राशींच्या लोकांना आज सापडतील नवे मार्ग; होतील आर्थिक लाभ

Rashi Bhavishya Today 15 July 2024 : आज सोमवार आषाढ शुक्लपक्ष तिथी - नवमी. राशीचक्रानुसार, या राशींच्या लोकांना आज सापडतील नवे मार्ग; होतील आर्थिक लाभ, वाचा राशीभविष्य....

Anjali Potdar

दैनिक पंचांग - वार सोमवार

दिनांक १५ जुलै २०२४ आषाढ शुक्लपक्ष तिथी - नवमी. नक्षत्र - स्वाती. योग - सिद्ध. करण - बालव. रास - तूळ दिनविशेष - उत्तम दिवस.

मेष : दिवस चांगला राहणार

आपली मतं काय आहेत याविषयी आपण ठाम राहणार आहात. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधता येईल. एकूण दिवस चांगला राहणार आहे.

वृषभ : मनोरंजनाकडे कल राहील

हितशत्रूंवर मात कराल. मनोरंजनाकडे कल राहील. दिवस संमिश्र असा राहील.

मिथुन : मन प्रसन्न राहील

बौद्धिक क्षेत्रात उत्तम संधी प्राप्त होईल. त्यामध्ये आनंद लाभेल. आशादायी वातावरण आणि मन प्रसन्न राहील.

कर्क : नवीन मार्ग सापडतील

नवीन दिशा, नवीन मार्ग कामासाठी सापडतील. प्रवासाचे नियोजन असेल तर प्रवास सुखकर होतील. त्यातून फायदा होऊ शकेल.

सिंह : कामाचा त्रास जाणवेल

नातेवाईकांचे चांगले सहकार्य लाभेल. कामाचा ताण त्रास जाणवेल. पण त्यातही एक वेगळा आनंद असेल.

कन्या : विशेष कष्ट घ्यावे लागतील

व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. मनोबलासाठी विशेष कष्ट घ्यावे लागतील. अनाठायी खर्च टाळा.

तूळ : सकारात्मकता वाढेल

आरोग्य उत्तम राहील. सकारात्मकता वाढेल. दैनंदिन कामे मार्गी होताना दिसून येईल.

वृश्चिक : वाहने जपून चालवावी

कोणाकडून खूप सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आज ठेवू नका. पैशाची आवक मात्र चांगली राहील. वाहने जपून चालवावी.

धनु : शेजाऱ्यांची मदत मिळेल

जे काम हातात घेतले आहे त्यामध्ये यश लाभणार आहे. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अडचणीच्या काळात शेजाऱ्यांची मदत मिळेल.

मकर : समाधान लाभणारा दिवस

सामाजिक क्षेत्रामध्ये सहभागी व्हाल. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभणारा आजचा दिवस आहे.

कुंभ : आर्थिक लाभ होतील

धार्मिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. आर्थिक लाभ होतील. संतती सुख आणि आत्मउन्नतीसाठी आजचा दिवस चांगला आहे.

मीन : वादविवाद करू नका

खर्चाचे प्रमाण वाढते राहील. तब्येतीच्या तक्रारी सुद्धा वाढतील. शक्यतो कोणाशी आज वादविवाद करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Motivation : सकाळी स्वत:ला या ५ सवयी लावा, आयुष्यात खुप पुढे जाल

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पविरोधात मोठं आंदोलन, 70 लाख आंदोलक रस्त्यावर , नेमकं कारण काय?

Liver disease warning: लिव्हर खराब झाल्यावर त्वचेवर दिसतात 'हे' बदल; गंभीर गुंतागुंत होण्यापूर्वी लक्ष द्या

Manoj Jarange Effect : जालना पोलिस पाटील भरतीत ‘जरांगे इफेक्ट’! मराठा समाजाच्या उमेदवारांचा डंका

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

SCROLL FOR NEXT