Horoscope Today 08 August 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today: धनलाभ, नोकरीची संधी; ऑगस्ट महिन्याच पहिलाच गुरूवार 'या' राशींसाठी ठरणार फलदायी, काय आहे आजचे राशीभविष्य?

Rashi Bhavishya Shukravar 8th August 2024: श्रावण महिन्याचा आज चौथा दिवस आहे. आज ८ ऑगस्ट रोजी कोणाच्या राशीत काय लिहिलंय, ते जाणून घेवू या.

Anjali Potdar

आजचे पंचाग ८ ऑगस्ट २०२४

गुरुवार दिनांक- ८ ऑगस्ट २०२४, श्रावण शुक्लपक्ष, विनायक चतुर्थी, नागचतुर्थी तिथी-चतुर्थी. रास-कन्या, नक्षत्र-उत्तरा, योग-शिव, करण-वणिज, दिनविशेष-११ प. चांगला.

मेष - उष्णतेचे विकार होतील

कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आणि काय गोष्टी पुढे ढकलायच्या हे आज ठरवा. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होणार नाहीत. उष्णतेचे विकार होतील. पित्ताच्या तक्रारी वाढतील.

वृषभ - आजचा दिवस सुखाचा

ज्येष्ठ लोकांसाठी नातवंडांच्या दृष्टीने आजचा दिवस सुखाचा राहणार आहे. इतरांसाठी करण्याची उर्मी आज जागृत होईल. भाग्य काही नवीन गोष्टी आपल्या ओंजळीत देणार आहे. त्याचे स्वागत करा.

मिथुन - व्यवसायामध्ये हितसंबंध प्रस्थापित

अडचणी आणि अडथळे यांची शर्यत आज पार करावी लागेल. पण दिवसाच्या शेवटी यश तुमचेच असेल. व्यवसायामध्ये हितसंबंध प्रस्थापित होतील.

कर्क- जुन्या गुंतवणुकीपासून फायदा

वृद्धांशी आणि मित्रांचे सौख्य आज लाभण्याचा दिवस आहे. जुन्या गुंतवणुकीपासून फायदा होईल. जे ठरवाल ते सुखाचे होईल. दिवस सुखाचा राहील.

सिंह - खर्चावर नियंत्रण ठेवा

खर्चाला आळा घाला. पाठीच्या मणक्याचे आजार डोके वर काढतील. दवाखान्यात विनाकारण पैसा खर्च होईल. तब्येत जपा आणि मनस्वास्थ सांभाळा.

कन्या - सकारात्मकतेच्या दृष्टीने वाटचाल

नवीन काही खरेदी करण्याची उर्मी आज जागृत होईल. स्वतःवर आणि स्वतःच्या कामावर ठाम विश्वास राहील. त्याच जोरावर आजचा दिवस चांगला राहणार आहे. सकारात्मकतेच्या दृष्टीने आज वाटचाल आहे.

तूळ - पैशाशी निगडित व्यवहार जपा

व्यापारामध्ये हलक्या अडचणी येण्याची शक्यता आहे, कुठे कोणाला जामीन राहू नका. नको त्या गोष्टीत नको त्या लोकांना बरोबर निर्णय घेतल्यामुळे त्रास उद्भवणार आहेत. पैशाशी निगडित व्यवहार जपा.

वृश्चिक - ठाम निर्णय घ्या

ठरवलेल्या गोष्टी करायलाच लागतील. त्यासाठी कोणाची साथ आहे वा नाही, याचा विचार न करता योग्य वाटचाल करा. ठाम निर्णय घ्या. इतरांचे कल्याण करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, याची जाणीव होईल. पत्रव्यवहार मार्गी लागतील.

धनु - मोठी गुंतवणूक होईल

घरामध्ये धार्मिक कार्य होतील. श्रावणामधल्या पूजनाच्या गोष्टीमध्ये उत्साहाने सहभाग घ्याल. मोठी गुंतवणूक असेल किंवा खर्च असतील, तर ज्येष्ठांच्या सल्ल्याने पुढे जा. योग्य मार्ग मिळेल.

मकर - दिवसाचा आनंद लुटा.

मनोरंजनाकडे कल राहील. प्रेम प्रणयाची स्वप्न रंगवाल. प्रियकर आणि जोडीदार यातला फरक ओळखा, दिवसाचा आनंद लुटा. उपासनेमध्ये सुद्धा प्रगती साधा.

कुंभ - मन आणि बुद्धीचा समन्वय आज साधा

मन आणि बुद्धी याचा समन्वय आज साधला पाहिजे. शरीराचे कष्ट वाढतील खूपदा अंग मेहनत करणं, म्हणजेच काम होणं असं नाही. आज बुद्धीने काम करा तर यश मिळेल.

मीन - दिवस चांगला जाणार

कोर्टकचेरीची कामे मागे लागतील. व्यवसायामध्ये मोठ्या जबाबदाऱ्या उचलण्यासाठी मनाची तयारी ठेवा. भागीदाराशी समन्वय साधून पुढील गोष्टींची आखणी करा. दिवस चांगला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT