Horoscope Today Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : नागपंचमीची उपासना फलदायी ठरणार, मित्रांसाठी पैसे खर्च कराल; वाचा आजचे राशीभविष्य

Rashi Bhavishya friday 9th August 2024: श्रावण महिन्याचा आज पाचवा दिवस आहे. आज ९ ऑगस्ट रोजी कोणाच्या राशीत काय लिहिलंय, वाचा सविस्तर

Anjali Potdar

आजचे पंचाग ९ ऑगस्ट २०२४

दिंनाक ९ ऑगस्ट २०२४ श्रावण शुक्लपक्ष,

नागपंचमी,हिरण्यकेशी उपाकर्म

तिथी-पंचमी २७|१५

रास-कन्या

नक्षत्र-हस्त

योग-सिध्दीयोग

करण-बव

दिनविशेष-उत्तमदिवस

मेष - नाती जपायचा प्रयत्न करा

पती-पत्नीमध्ये मतभेदाची शक्यता आहे.आपली नाती जपण्याचा प्रयत्न करा. तसेही राग आला की आपल्याला अनेक गोष्टी नियंत्रणात येत नाहीत असे वाटेल. तो टाळा.

वृषभ - नागपंचमीची उपासना फलदायी ठरणार

चांगल्या गोष्टींसाठी पैसा खर्च कराल. अध्यात्मात मन रमेल .सकारात्मकता वाढणार आहे. कामाच्या गोष्टी द्रुगोचर होतील. यशाचे दरवाजे उघडतील. नागपंचमीची विशेष उपासना फलदायी ठरेल.

मिथुन - दिवसभरात प्रवास घडतील

व्यवधान ठेवण्याचा आजचा दिवस आहे. एकावेळी अनेक गोष्टी केल्यामुळे त्रेधा तिरपीट उडेल. सहकाऱ्याकडून गोड बोलून काम करून घ्यावे. प्रवास घडतील.

कर्क- मित्रांसाठी पैसे खर्च कराल

नातेवाईक आणि त्यांच्यापासून लाभाची शक्यता आहे. मित्रांसाठी पैसा खर्च कराल. त्यातून आनंद मिळेल. स्नेहभोजनाची पर्वणी लाभणार आहे.

सिंह- वाईट गोष्टी करणे टाळा

वाईट गोष्टी केल्या तर त्याचे कर्म भोगावे लागते. मग तो मानसिक त्रास या मार्गातून सुद्धा कर्म येते. आजचा दिवस उगाचच नको त्या गोष्टींची उजळणी करण्यात जाईल. तो व्याप टाळा.

कन्या - आपला आत्मविश्वास वाढणार

व्यापार उदिमाकडे नव्याने बघाल. काही गोष्टी अवाक्यात ठेवल्या तर फायदा आहे. आपला आत्मविश्वास वाढेल. दिवस आनंद घेऊन आलेला आहे.

तूळ - पैशाची आवक चांगली राहणार

खाद्यपदार्थांची रेलचेल राहील स्वैर जगायला आज आवडेल. पैशाची आवकही चांगली राहील. मोठी गुंतवणूक करण्यासाठी दिवस सुसंधी घेऊन आला आहे.

वृश्चिक- स्वतःला ओळखा

भावंडांचे आपल्यावर विशेष प्रेम राहील. एकमेकांच्या संगनमताने चांगल्या गोष्टी कराल. स्वतःला ओळखायला शिका. अनेक गोष्टी एकत्र करण्यासाठी आपली रास सक्षम आहे.

धनु - तुमच्या कामाचे वजन वाढणार

शेतीवाडी चे व्यवहार मार्गी लागतील. ठरवलेल्या गोष्टी होतील कुटुंबाचे काही भार उचलावे लागतील. आपल्या कामाचे वजन वाढेल.

मकर - धार्मिक गोष्टींनी दिवस सुकर जाणार

नागपंचमीची शिवाची विशेष उपासना आपल्याला फलदायी ठरणार आहे. त्या गोष्टींवर भर द्या. आपल्यातील अतींद्रिय शक्ती जागृत करा. ऐहिक गोष्टीच्या मागे लागण्यापेक्षा धार्मिक गोष्टींनी दिवस सुकर जाईल.

कुंभ - चोरीपासून सावधान

चोर, चोरी त्यापासून सावधान. आपल्या वस्तू सांभाळा विनाकारण त्रागा करून उपयोग होणार नाही. मनोबल वाढवणे गरजेचे आहे. गुप्तशत्रू त्रास देतील.

मीन - दिवस सुखाचा जाणार

जोडीदारावर विशेष प्रेम जडेल. दोघे मिळून संसारिक गोष्टींसाठी वेळ खर्च कराल. प्रेमाने जग जिंकता येते हे जाणवेल. दिवस सुखाचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT