Rashi Bhavishya Today 3 May 2024 Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Rashi Bhavishya Today 3 May 2024: आजचे राशिभविष्य, ३ मे २०२४: तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Anjali Potdar

दैनिक पंचांग ३ मे २०२४

वार - शुक्रवार तिथी - कृ .दशमी (२३/२५) नक्षत्र - शततारका

रास - कुंभ, योग - ब्रम्हा करण - विष्टि, दिनविशेष - १३ प.चांगला

मेष: कामाचे चीज होईल

जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. मित्रांशी बोलून मन मोकळ होईल. व्यवसायामध्ये केलेल्या कामाचे चीज होईल. नवीन संधी मिळतील. कुणाला पैसे उसने देताना त्याची खबरदारी घ्यावी.

वृषभ: कामांमध्ये ओळखी वाढतील

नवीन नोकरी व्यवसायाच्या शोधात असाल तर सकारात्मक वाटते आहे. नवीन संधी मिळतील. कामांमध्ये ओळखी वाढतील. काही चांगल्या गोष्टींचे आयोजन आपल्याकडून होईल. कामाबरोबर दिवसाचा आनंद घ्याल.

मिथुन: नोकरीमध्ये महत्त्व वाढेल

आपल्या स्वभावाप्रमाणे काही कामे आपल्या कडून बऱ्याचदा अर्धवट राहतात . आज मात्र ते काम यशस्वीपणे पूर्ण करा. तुमच्या कामाची प्रशंसा पण होईल. नोकरीमध्ये महत्त्व वाढेल. सार्वजनिक कामाची जबाबदारी मिळेल.

कर्क: जोडीदाराकडून त्रास संभवतो

मनमौजी आयुष्य जगताना काही अडचणी येऊ शकतात. अचानक धनलाभ होईल. जोडीदाराकडून त्रास संभवतो. आर्थिक उलाढाल विचारपूर्वक करा.

सिंह: दिवस सुखाच्या संधी घेऊन येणारा

जोडीदाराविषयी तू तू महिमा आपले कायमच राहते. पण आजचा दिवस थोड्या सुखाच्या संधी घेऊन येत आहे. म्हणून त्याकडे विशेष लक्ष द्या. नोकरी व्यवसायामध्ये व्यस्ताता पाचवीला पुजलेली आहे. हुकूमत सोडून प्रेमाने गोष्टी केल्यास यश मिळेल.

कन्या: महत्त्वाची कामे पुढे ढकला

घाई गडबडीमध्ये निर्णय घेऊ नका. महत्त्वाची कामे पुढे ढकलणे योग्य राहील. कामामध्ये व्यस्तता हेच आजच्या दिवसाचे द्योतक आहे. द्विधा मनस्थिती टाळा.

तूळ: चांगल्या बातम्या कानावर येतील

ग्रह आपल्या दृष्टीने कौल देत आहेत. चांगल्या बातम्या कानावर येतील. सार्वजनिक कामात सहभागी व्हाल. उत्साह वाढता राहील. "दैव देते कर्म नेते" अशा गोष्टी आज व्हायला नकोत. विशेष लक्ष द्या.

वृश्चिक: जबाबदारी टाळू नका

नोकरी व्यवसायात मोठ्या जबाबदाऱ्या येतील. कार्यक्षेत्रात प्रगती राहील. नवीन कामात सहभागी व्हाल. जबाबदारी टाळू नका. मन मोकळे जगा.

धनु: कामाचा वेग चांगला राहील

मित्र व नातेवाईक मदतीला धावून येतील. अडकलेले प्रस्ताव मंजूर होतील. केलेल्या कामाचं अचानक श्रेय मिळेल. जुने प्रस्ताव मंजूर होतील. कामाचा वेग चांगला राहील.

मकर: समाजात मान वाढेल

खर्चाचे प्रमाण आटोक्यात ठेवा. कुटुंबीयांशी आदबीने वागा. समाजात मान वाढेल. काही गोष्टी काटेकोरपणे पाळल्यात तर दिवस सुकर राहील.

कुंभ: शिव उपासना करावी

मन आनंदी राहील. जोडीदार आपल्या मर्जीनुसार वागेल. वातावरण खेळीमेळीचे राहील. घरातल्यांना सांभाळून घेण्यात आजचा दिवस जाईल. शिव उपासना करावी.

मीन: दत्त उपासना करा

आपल्या राशीप्रमाणे संवेदनशील विचार करण्याचे सोडून द्या. दत्त उपासना करा. मन शांत ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास दिवस चांगला राहील. वाणीत गोडवा हिच मेवा मिठाई.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update अमरावतीत 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

माता न तू वैरिणी! चिमुकलीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच आई...; ठाण्यातील खळबळजनक घटना|VIDEO

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

MNS : मराठी असूनही ते एका मराठी मुलीलाच टार्गेट करत आहेत, मनसे नेत्याच्या मुलाकडून शिवीगाळ; इन्फ्लूएन्सरने सांगितली आपबिती

Blood Pressure: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी वरदान ठरेल 'ही' एक गोष्ट

SCROLL FOR NEXT