Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : जोडीदार लाभण्याचा आजचा योग, मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today in Marathi : आज तुम्हाला जोडीदार लाभण्याचा दिवस आहे. मोठ्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

गुरुवार,१७ ऑक्टोबर २०२४, अश्विन शुक्लपक्ष,

कार्तिकस्नानारंभ.

तिथी- पौर्णिमा १६|५६

रास-मीन १६|२० नं. मेष

नक्षत्र- रेवती

योग-हर्षण

करण-विष्टिकरण ०६|४९

बवकरण १६|५६

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - धावपळीने आज तब्येत बिघडण्याचे योग आहेत. उष्णता ऍसिडिटी याचे त्रास होऊ शकतात. तब्येतीवर पैसा खर्च होऊ शकतो. होईल ती काळजी घ्या.

वृषभ -प्रेमाच्या जोडीदार लाभण्याचे आज योग आहेत. दिवस सकारात्मक आणि आनंदी राहील. जुन्या केलेल्या गोष्टींचे आज निश्चित चांगले फळ मिळेल.

मिथुन- कराल तसे भराल असा आजचा दिवस आहे. आपले कर्म चांगले ठेवा. जोडलेल्या लोकांमुळे आज आपला फायदा होईल. वरिष्ठ लोकांकडून विशेष कौतुकाची थाप आपल्याला मिळेल.

कर्क - अगंतुक पाहुण्यांचे आगमन आज दिसते आहे. त्यांच्याकडून काही नवीन चांगले संदेश पुढील आयुष्यासाठी आपल्याला दिसतील. आनंदाने भारलेला आजचा दिवस आहे. शिव उपासना फलदायी ठरेल.

सिंह- आज पैसा जपण्याचा दिवस आहे. अचानक धनलाभ होईल. मोठ्या स्वरूपात पैसा मिळण्याचा योग आहे. पण हे लक्षात ठेवा हा पैसा वाईट मार्गातून आलेला नसावा. राजकारणातील लोकांनी विशेष सावधगिरी बाळगावी.

कन्या- व्यवसायासाठी नवीन वाटा मिळतील. काही ठराविक कामाच्या अडकलेल्या गोष्टी कोर्टाच्या माध्यमातून आज पूर्वपदावर येतील. मोठ्या जबाबदाऱ्या आणि रिस्क नको. सहज साधी कामे करा तर आज दिवस चांगला राहील.

तूळ - आज मितिला जिथे पर्यंत आलो आहोत त्याच्या समाधान बाळगा. कष्ट आणि त्रास या गोष्टी एवढ्यात खूप झाल्या आहेत. आता आज त्या संपुष्टात येतील. थोडे धाडसाने पुढे चला. पुढचे दिवस चांगले येणार आहेत .

वृश्चिक - शंकराची उपासना करा. मनोकामना पूर्ण होतील. संततीच्या बाबतीत चांगल्या घटना आज कानावर पडतील. घेतलेल्या कामांमध्ये सुयशप्राप्ती होईल.

धनु - घरामध्ये नवीन काही गोष्टींची खरेदी होईल. प्रॉपर्टीशी नवीन प्रस्ताव येतील त्याचे स्वागत करा. मोठे धाडस करण्यासाठी कचरू नका योग्य निर्णय घ्या आणि पुढे चला.

मकर - एखादा जुना अबोला आपल्या भावंडांशी असेल तर आज तो संपुष्टात येईल. मनामध्ये अढी बाळगून कोणतेही काम करू नका. कामाच्या ठिकाणी धावपळ धडपड होईल पण आपण केलेल्या कामावर आपले सहकारी खुश होतील.

कुंभ - कुटुंबीयांच्याकडून एखादी चांगली बातमी कानावर येईल. कदाचित या गोष्टी पैशाच्या निगडित किंवा वडिलोपार्जित प्रॉपर्टीशी निगडित असू शकतील. हा आनंद सुगंधाच्या कुपीप्रमाणे जपा.

मीन - धावपळीच्या जीवनात एखादा दिवस स्वतःसाठी असावा असे वाटते. आज जो दिवस आहे स्वतःसाठी जगाल. मनासारख्या काही गोष्टी कराल त्यामुळे एक वेगळाच आनंद आणि ऊर्जा घेऊन भारलेला आजचा दिवस असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 'हे' नॅचरल फॅट बर्नर पदार्थ रोज खा!

Congress: 'बिडी-बिहार'च्या पोस्टनं राजकारण तापलं; वादानंतर काँग्रेसचा माफीनामा

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

SCROLL FOR NEXT