Daily Horoscope Today Today Saam TV
राशिभविष्य

Horoscope: सावधान! अडचणी, आर्थिक संकट येणार; तर काहींना होणार मानसीक त्रास, जाणून घ्या कोणत्या राशींसाठी कसा असेल शनिवार

Daily Horoscope : काही राशींच्या जातकांना नाहक त्रास होण्याची शक्यता आहे. काही राशींच्या नात्यात सुधारणा होईल. पण काहींना मानसीक त्रासाचा सामना करावा लागेल.

Anjali Potdar

शनिवार,२२ फेब्रुवारी २०२५,माघ कृष्णपक्ष,

श्री रामदास नवमी.

तिथी- नवमी १३|२०

रास- वृश्चिक १७|४० नं. धनु

नक्षत्र- जेष्ठा

योग- हर्षण

करण- गरज

दिनविशेष- १८ नं. चांगला

मेष - कामाचा ताण होत असताना डोके शांत ठेवणे आज गरजेचे आहे. विनाकारण काही वाईट गोष्टींचा ससेमीरा मागे लागेल. मात्र जोडीदाराकडून धनयोगाचे योग दिसत आहेत.

वृषभ - कधी कधी आपली चूक नसताना वाईट गोष्टीत ओढले जाता. कोर्टाच्या घटना गोष्टी मागे लागतील. मात्र आजच्या कोर्टाच्या कटकटीतून सुटण्याचा दिवस आहे. तुमच्या मनाप्रमाणे निर्णय लागतील.

मिथुन - आजोळी प्रेम लाभेल. जुनी रेंगाळलेली कामे होण्याची शक्यता आहे. मात्र हितशत्रू वाढतील. प्रेमात सर्व माफ असते हे समजेल.दिवस बरा आहे.

कर्क - आज शिव उपासना फलदायी ठरणार आहे. जास्तीत जास्त जप, आराधना केल्यास दिवस सार्थकी लागेल. प्रेमवीरांसाठी दिवस चांगला आहे. नवीन वचने प्रेमात दिली घेतली जातील.धनयोग उत्तम आहेत.

सिंह - खूप दिवस मनात राहिलेल्या गोष्टी आज पूर्णत्वास येतील. जसं की घर घेणे,गाडी घेणे, जागेचे खरेदी विक्रीचे व्यवहार यामध्ये आज सफलता मिळेल. दिवस चांगला आहे.

कन्या- लेखन -प्रकाशन तसेच वाणीमध्ये एकवाक्यता आणि त्यात प्रसिद्धी मिळेल. भावंड सुखाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. नवीन पराक्रम घडतील. स्वतःवर खुश व्हाल.

तुळ - कामाची विशेष ओढ वाटेल. त्याविषयी सृजनशीलता वृद्धिंगत होईल. पैशाची आवक जावक चांगली असल्यामुळे दिवस समाधानकारक राहील.

वृश्चिक- दहा गोष्टी एकट्यालाच कराव्या लागतील. पण त्यामध्ये स्वतःचे नाणे किती खणखणीत आहे हे जाणवेल. नवा आत्मविश्वास वाढीस लागेल. महत्त्वाकांशा वाढतील. दिवस चांगला आहे.

धनु - उष्णतेच्या झळा वाढत आहेत. डोळ्याशी निगडित आजार, ताण, त्रास याची आज विशेष काळजी घ्यावी. उष्णतेचे विकार वाढतील. बंधन योग आहेत.

मकर - पोट पाठीला लागेपर्यंत आपण कामे केली आहेत. आज अशा काही कामांचा व्यास पूर्णत्वास जाऊन त्याची परिणीती चांगल्या गोष्टीत होईल. अनेक लाभ होतील.

कुंभ - छोट्याश्या गोष्टीसाठी अधिकाधिक मेहनत करावी लागेल. यशाच्या पायऱ्या सोप्या नसतात हे जाणवेल. पण सर्वात उंच एक सुयशाची कमान मात्र प्रस्थापित कराल.

मीन - देवाने अनेक भाग्यकारक गोष्टी आपल्या झोळीत टाकल्या आहेत. आज कृतकृत्य भावना निर्माण होईल. सहजगत्या मनासारख्या गोष्टी घडतील. भाग्यकारक घटनांचा सुदिन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT