June 2025 Grah Gochar Rashifal saam tv
राशिभविष्य

June Grah Gochar: जून महिन्यात ४ ग्रह बदलणार रास; ३ राशींना मिळणार छ्प्परफाड पैसा

June 2025 Grah Gochar Rashifal : प्रत्येक महिन्याला ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. येत्या जून महिन्यात ४ ग्रह रास बदलणार आहेत. यावेळी कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी प्रत्येक महिन्याला कोणता ना कोणता ग्रह त्याच्या राशीत बदल करतो. ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या जीवनावर होत असतो. येत्या जून महिन्यात महत्त्वाच्या ग्रहांचं गोचर होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

जून महिन्याची सुरुवात शुक्राच्या राशी बदलाने होणार आहे. याशिवाय जून महिन्यात, सूर्य, बुध आणि मंगळ देखील त्यांची राशी बदलणार आहेत. ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

धनु रास

जून महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या महिन्यात गुरुची सातवी दृष्टी त्याच्या स्वतःच्या धनु राशीवर असणार आहे. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहात. मालमत्तेचे व्यवहार यशस्वी ठरणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगलं जाणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी जून महिना सकारात्मक ठरू शकणार आहे. या महिन्यात शुक्र मेष राशीत असेल आणि स्वतःच्या राशीवर म्हणजेच तूळ राशीवर लक्ष ठेवणार आहे. तुम्हाला पदोन्नती मिळेल आणि तुमच्या कारकिर्दीत मोठे यश मिळणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळू शकणार आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

कुंभ रास

जून महिना तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन सुरळीत जाणार आहे. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकणार आहे. तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. तुम्हाला पदोन्नती मिळेल आणि तुमच्या कारकिर्दीत मोठे यश मिळू शकतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री विजय यांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का; पाठिंबा देणारा मित्रपक्ष झाला नाराज, नेमकं काय घडलं?

Accident News : लग्नाला निघालेल्या दाम्पत्याचा भीषण अपघात, भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानाचा परिणाम चिमुकल्यांवर होत असल्याने पालकांची चिंता वाढली

Protein Foods: प्रोटीनसाठी चिकन अन् प्रोटीन पावडर कशाला? हे 5 व्हेज पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

Sanju Rathod Success Story: ट्रेनमध्ये बसून एकट्याने गाणी ऐकली, पण आज बनला प्रसिद्ध गायक ; 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडला आठवला संघर्षाचा तो काळ

SCROLL FOR NEXT