Grah Gochar saam tv
राशिभविष्य

Grah Gochar: गुरु, शनि आणि राहू-केतू मिळून 'या' राशींचं नशीब चमकवणार; बक्कळ पैसा मिळून उत्पन्नात होणार वाढ

Grah Gochar: अनेक मोठे ग्रह या वर्षात त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. २०२५ मध्ये शनी, राहू-केतू आणि गुरु त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने येणारं नव वर्ष खूप खास असणार आहे. याचं कारण म्हणजे अनेक मोठे ग्रह या वर्षात त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. २०२५ मध्ये शनी, राहू-केतू आणि गुरु त्यांच्या राशीत बदल करणार आहेत.

ग्रहांमध्ये न्यायाधीश म्हणून ओळखले जाणारे शनिदेव 29 मार्च 2025 रोजी आपली हालचाल बदलून मीन राशीत पोहोचणार आहे. तर गुरू 14 मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, 2025 मध्ये 18 मे रोजी राहू कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याचप्रमाणे या दिवशी केतू सिंह राशीत गोचर करणार आहे.

या काळात या ग्रहांच्या स्थिती बदलामुळे काही राशींच्या व्यक्तींना आयुष्यात लाभ होणार आहे. काहींना करियरमध्ये नवी संधी मिळणार आहे, तर काही राशींना अचानक पैसे मिळू शकणार आहेत. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे.

वृषभ रास

2025 मध्ये शनि, राहू-केतू आणि गुरूचे राशी परिवर्तन वृषभ राशीसाठी विशेष मानलं जाणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकणार आहेत. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. मित्र आणि कुटुंबियांशी संबंध दृढ होणार आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे.

कर्क रास

2025 मध्ये होणारे राहू-केतू, शनि आणि गुरूचं परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानलं जाणार आहे. 2025 मध्ये तुम्हाला चांगल्या करियरच्या संधी उपलब्ध होणार आहे. यावेळी तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.

कुंभ रास

2025 मध्ये शनी, राहू-केतू आणि गुरूचं गोचर या राशीसाठी अनुकूल मानलं जातंय. नवीन वर्षात तुम्हाला व्यवसायात मोठ्या सौद्यांमध्ये यश मिळू शकणार आहे. व्यवसायात तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. मान-सन्मानात वाढ होणार आहे. तुमच्या या काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT