Mangal Planet Transit In Cancer saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar: ऑक्टोबरपासून 'या' राशींवर राहणार मंगळाची कृपा, संपत्तीत वाढ होण्यासोबत भाग्यही उजळणार

Mangal Planet Transit In Cancer: मंगळ ग्रह गोचर करणार असून त्याचा प्रभाव जवळपास सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. जाणून घेऊया या गोचरचा परिणाम कोणत्या राशींवर होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करतात. गोचर म्हणजेच ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये भ्रमण करतात. येत्या काळात मंगळ ग्रह गोचर करणार आहे. मंगळाच्या राशी बदलाचा प्रभाव जवळपास सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे.

मंगळ ऑक्टोबर महिन्यात कर्क राशीत प्रवेश करणार आहे. याठिकाणी नीचभंग राजयोग तयार होणार आहे, ज्यामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. या राशींच्या व्यक्तींना या काळात अतिरीक्त पैसे मिळू शकतात. तर कुटुंबामधील वाद संपुष्टात येणार आहेत.

वृश्चिक रास

मंगळ ग्रहाचं भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे . यावेळी नशीब तुमच्या बाजूने असू शकणार आहे. नोकरीमध्ये चांगल्या संधी मिळू शकणार आहेत. तुम्हाला अचानक प्रलंबित पैसे मिळू शकणार आहेत. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहात.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचं गोचर लाभदायक ठरणार आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते. ज्या व्यक्तींना परदेशी फिरण्यासाठी जायचं आहे, त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे.

मिथुन रास

मंगळ ग्रहाचं गोचर या राशीसाठी लाभदायक ठरू शकतं. यावेळी तुमच्या करिअरमध्ये अचानक वाढ होणार आहे. बँक बॅलन्स वाढवून तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना कर्जाचे पैसे मिळू शकतात.संपत्ती मिळवण्याच्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT