Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Shadashtak Yog 2024: २५ डिसेंबरपासून 'या' राशींसाठी सुरु होणार अच्छे दिन; षडाष्टक योग करणार मालामाल

Shadashtak Yog 2024: ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला त्याची रास बदलतो. तर दुसरीकडे मंगळ दर दीड महिन्याला त्याच्या राशीत बदल करतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. या राजयोगांचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर काही ना काही परिणाम होत असतो. यामध्ये ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला त्याची रास बदलतो. तर दुसरीकडे मंगळ दर दीड महिन्याला त्याच्या राशीत बदल करतो.

2024 वर्षाच्या अखेरीस मंगळ आणि सूर्य मिळून एकत्र षडाष्टक नावाचा योग तयार करणार आहेत. हा योग अत्यंत अशुभ मानला जातो. परंतु सूर्य आणि मंगळ हे मित्र असल्यामुळे काही राशींवर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकणार आहे. जाणून घेऊया या राजयोगाच्या निर्मितीने कोणत्या राशींच्या व्यक्तींवर चांगला परिणाम होणार आहे.

वैदिक कॅलेंडरनुसार, जेव्हा दोन ग्रह सहाव्या आणि आठव्या घरात एकमेकांपासून असतात तेव्हा षडाष्टक योग तयार होतो. मंगळ आणि सूर्य 25 डिसेंबर रोजी 150 अंशांवर असतील, त्यामुळे षडाष्टक योग तयार होत आहे.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी जीवनातील समस्या आणि आव्हानं संपुष्टात येणार आहेत. व्यवसायातही तुम्हाला मोठं यश मिळू शकणार आहे. नोकरदार लोकांसाठीही हा कालावधी खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाऊ शकणार आहे.

कर्क रास

षडाष्टक योग या राशीच्या लोकांसाठी आनंद आणणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही विचारपूर्वक घेतलेला निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. ज्या व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना यश मिळणार आहे. तुम्ही नवीन व्यवसायात प्रवेश करू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. या काळात तुम्हाला व्यापारातून भरपूर पैसा मिळवता येणार आहे.

धनु रास

या राशीच्या लोकांना मंगळासोबत सूर्यदेवाची विशेष कृपा असणार आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुरू असलेल्या समस्या संपणार आहेत. तुम्हाला अनपेक्षित फायदे मिळू शकणार आहेत. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

Panvel Tourism: अवघ्या १०० रूपयांत फिरा पनवेलमधील ही ठिकाणे, विकेंडला येईल फुल टू मज्जा

Pune News: अंगावर घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; पुण्यात खळबळ

Maharashtra News Live Update: भोंदूबाबाला अटक झाल्याच्या दिवशीच, पत्नीच्या नावावर जमीन; व्यवहारावर संशय

SCROLL FOR NEXT