Horoscope saam tv
राशिभविष्य

Gajkesari Yog: 72 तासांनंतर 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; गजकेसरी राजयोगाने मिळणार पैसाच पैसा

Gajkesari Yog 2025: चंद्र ग्रह साधारणतः प्रत्येक दोन ते अडीच दिवसांनी नव्या राशीत भ्रमण करतो. याच काळात जेव्हा चंद्राचा इतर ग्रहांशी विशेष योग जुळतो, तेव्हा प्रभावी राजयोग तयार होतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहातील प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर रास बदलतो. ज्याचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर परिणाम प्रकारे निश्चितच होतो. चंद्र दर अडीच दिवसांनी त्याच्या राशीमध्ये बल करतो. यावेळी इतर ग्रहांसोबत तयाचा संयोग होतो. ज्यामुळे अनेकदा खास राजयोग निर्माण होणार आहे. असाच एक राजयोग म्हणजेच गजकेसरी ११ एप्रिल रोजी निर्माण होणार आहे.

चंद्र १० एप्रिल रोजी संध्याकाळी ७:०४ वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर तो १३ एप्रिल रोजी सकाळी ७:३८ वाजेपर्यंत या राशीत राहणार आहे. यावेळी वृषभ राशीत उपस्थित असलेला गुरुची दृष्टी चंद्रावर पडणार आहे. ज्यामुळे हा शक्तीशाली गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. यावेळी काही लोकांना याचा सकारात्मक परिणाम मिळणार आहेत.

मकर रास

या राशीत, चंद्र नवव्या घरात भ्रमण करणार आहे. या राशीच्या व्यक्तींच्या वैयक्तिक जीवनात येणाऱ्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. या काळात तुमचा मानसिक ताण थोडा कमी होऊ शकेल. यावेळी तुमचा अध्यात्माकडे कल राहील. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे.

मेष रास

या राशीच्या लोकांसाठीही गजकेसरी राजयोग भाग्यवान ठरू शकतो. गजकेसरी राजयोग देखील या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता अधिक आहे. धार्मिक कामे करून तुम्हाला खूप आनंद मिळू शकणार आहे. तुम्हाला नवीन मित्र भेटू शकतात.

सिंह रास

या राशीच्या दुसऱ्या घरात चंद्र असेल आणि दहाव्या घरात गुरु ग्रह असणार आहे. संभाषणाद्वारे तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. यावेळी वरिष्ठांकडून तुम्हाला सहकार्य मिळू शकणार आहे. पगारवाढीसोबतच पदोन्नतीचीही शक्यता आहे. तुम्ही वडिलोपार्जित मालमत्तेतून चांगला नफा कमवू शकता. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली घोषणा

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT