Mahalakshmi Yog saam tv
राशिभविष्य

Mahalakshmi Yog : 5 एप्रिलपासून 'या' राशींवर मेहेरबान असणार लक्ष्मी देवी, मंगळ-चंद्राच्या युतीने बनणारा योग करणार मालामाल

Mahalakshmi Yog 2025: मंगळ ग्रह येत्या काळात गोचर करणार असून त्याचा चंद्राशी संयोग होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीने महालक्ष्मी राजयोगाची निर्मिती होणार आहे. या काळात काही राशींना लाभ होण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ सध्या मिथुन राशीमध्ये विराजमान आहे. ३ एप्रिल रोजी मंगळ गोचर करणार असून तो कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मंगळाला साहस, ऊर्जा, शक्ती तसंच पराक्रम यांचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत मंगळाच्या राशी बदलाचा प्रत्येक राशीच्या व्यक्तीवर काही ना काही परिणाम होत असो. मंगळ या राशीमध्ये जून महिन्यापर्यंत राहणार असून यावेळी त्याची इतर ग्रहांशी युती देखील होणार आहे.

चंद्राशी होणार मंगळाची युती

या काळात मंगळ ग्रहाची चंद्राशी युती होणार आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच ५ एप्रिल रोजी चंद्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. अशात मंगळ आणि चंद्राची युतीने महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाची निर्मिती काही लोकांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आणणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

तूळ रास

मंगळ आणि चंद्रामुळे तयार होणार्‍या महालक्ष्मी राजयोगामुळे या राशीला लाभ होणार आहे. करियरमध्ये किंवा व्यापारात तुम्हाला फायदा होणार आहे. दीर्घकाळापासून रखडलेली कामं आता पूर्ण होणार आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबतचे तुमचे संबंध चांगले राहणार आहेत. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

कन्या रास

या राशीच्या लग्न भावामध्ये महालक्ष्मी राजयोगाची निर्मिती होणार आहे. या राशींच्या व्यक्तींना प्रत्येक कार्यामध्ये यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुमच्या सर्व आर्थिक इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत.

मकर रास

या राशीच्या सातव्या भावात हा राजयोग निर्माण होत असल्याने या राशीच्या व्यक्तींनाही लाभ मिळणार आहे. या काळात तुम्हाला लग्नाचे उत्तम प्रस्ताव येणार आहेत. पार्टनरसोबत असलेल्या सगळ्या समस्या संपुष्टात येणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाकडून सहकार्य लाभणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab Photo: रूप तेरा मस्ताना! शिवालीचं सौंदर्य पाहून हृदयाची धडधड वाढेल

Maharashtra Live News Update : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनकडून मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट

Today Gold Rate : १० तोळं सोन्याचे दर ५००० रूपयांनी वाढले, आजचे भाव काय? जाणून घ्या सविस्तर

Bhandara : भंडाऱ्यात मुसळधार पाऊस, गावांचा संपर्क तुटला | VIDEO

Saam Impact : दोन पुलांच्या उभारणीसह ६ किमीचा रस्ता; साम टीव्हीच्या बातमीनंतर बांधकाम विभागाकडून मोजणी

SCROLL FOR NEXT