Gajkesari Rajyog saam tv
राशिभविष्य

Gajkesari Rajyog: 12 वर्षांनी बुध ग्रहाच्या राशीत बनवणार पॉवरफुल योग; कन्या, मिथुन, सिंह राशींना कोणता होणार फायदा?

Gajkesari Rajyog 2025: ग्रहांच्या गोचरमुळे राजयोगांची निर्मिती होत असते. यावेळी काही राशींमध्ये एक किंवा दोन ग्रहांची युती होते. असाच येत्या काळात एक राजयोग निर्माण होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे शुभ आणि राजयोग निर्माण होतात. ज्याचा मानवी जीवनावर त्याचप्रमाणे देशावर अधिक परिणाम होत असतो. १४ मे रोजी रात्री गुरू मिथुन राशीत भ्रमण करणार आहे. तर १७ मे रोजी चंद्र धनु राशीत प्रवेश करेल.

अशा परिस्थितीत, चंद्र आणि गुरु एकमेकांसमोर असणार आहे. त्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. त्याचबरोबर या राजयोगामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभासोबत प्रगतीची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे ते पाहूयात.

कन्या रास

गजकेसरी राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती मिळणार आहे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळू शकणार आहेत.

मिथुन रास

गजकेसरी राजयोगाच्या निर्मितीसह, मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहणार आहे. या काळात तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील.

सिंह रास

गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या उत्पन्न स्थानावर तयार होणार आहे. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती मजबूत राहणार आहे. त्याचप्रमाणे पैसे गुंतवण्याची ही योग्य वेळ आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT