Gajkesari Yog saam tv
राशिभविष्य

Gajkesari Yog: गजकेसरी योग 'या' 3 राशींना करणार मालामाल; बंपर लाभासह नवी नोकरी मिळण्याची शक्यता

Gajkesari Yog 2025: हा योग सुमारे ५४ तासांसाठी तयार होतो. ज्यावेळी चंद्र एका राशीत असतो. या शुभ मुहूर्तावर कोणतंही काम सुरू केलं तर यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी गुरु चंद्राशी युती करतो किंवा गुरुची दृष्टी चंद्रावर येते आणि शुक्र आणि बुधाची दृष्टी चंद्रावर येते तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो. ज्योतिषशास्त्रात गजकेसरी हा एक अतिशय विशेष योग बनतो. या योगाच्या निर्मितीमुळे प्रत्येक राशींच्या जीवनावर काही ना काही परिणाम होत असतो.

शास्त्रानुसार, हा योग सुमारे ५४ तासांसाठी तयार होतो. ज्यावेळी चंद्र एका राशीत असतो. या शुभ मुहूर्तावर कोणतंही काम सुरू केलं तर यश मिळण्याची दाट शक्यता आहे. चंद्राने आज म्हणजेच ५ मार्च रोजी सकाळी ८:१२ वाजता वृषभ राशीत प्रवेश केला आहे. तर ७ मार्च रोजी सकाळी ११:४४ वाजेपर्यंत तो याच राशीत राहणार आहे. यामुळे कोणत्या राशींना शुभ परिणाम मिळतील ते पाहूयात.

मकर रास

गजकेसरी राज योग या राशीच्या लोकांचे भाग्य उजळवू शकतो. तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंद मिळू शकणार आहे. तुमच्या सर्जनशीलतेत झपाट्याने वाढ होणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना बरेच फायदे मिळू शकतात. तुमचं मन पूर्णपणे शांत राहणार आहे.जर मुलांच्या बाजूने काही समस्या असेल तर ती आता सोडवता येईल.

कर्क रास

कर्क राशीला देवगुरू गुरूची उच्च राशी मानले जाते. गजकेसरी राज योग निर्माण झाल्यामुळे या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. यासोबतच पैशांचा पाऊस पडेल. या काळात तुम्हाला आर्थिक फायदाही मिळू शकणार आहे. कोणत्याही कामात भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल.

धनु रास

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग देखील फायदेशीर ठरू शकणार आहे. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला यश मिळू शकणार आहे. यामुळे तुम्ही बँकेकडून कर्ज मिळविण्यात यशस्वी होऊ शकता. यावेळी तुम्हाला व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT