Horoscope saam tv
राशिभविष्य

Gajkesari Yog: 24 तासांनंतर बनणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा, चंद्रामुळे होणार आर्थिक लाभ

Gajkesari Yog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा सर्वाधिक वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. तो प्रत्येक राशीत अवघे अडीच दिवस व्यतीत करतो. जेव्हा चंद्र एखाद्या ग्रहासोबत संयोग करतो, तेव्हा शुभ किंवा अशुभ राजयोगांची निर्मिती होते.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा एकमेव ग्रह आहे, जो सर्वात वेगाने फिरतो. चंद्र हा एका राशीमध्ये एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा वेळी चंद्र एखाद्या ग्रहाशी संयोग करतो तेव्हा ज्यामुळे शुभ आणि अशुभ राजयोग तयार होतात. होळीच्या दिवशी म्हणजेच 14 मार्च रोजी दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी चंद्र कन्या राशीत भ्रमण करणार आहे.

चंद्र 17 मार्च रोजी रात्री 1.15 वाजेपर्यंत या राशीत राहणार आहे. याशिवाय वृषभ राशीत गुरू असणार आहे. त्याची नजर चंद्रावर पडणार असून गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींचे नशीब चमकवू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग लाभदायक ठरणार आहे. यावेळी लोकांच्या जीवनात आनंद येऊ शकतो. तुमचं घर इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. या राशीच्या जातकांमध्ये नेतृत्व कौशल्य वाढणार आहे. ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग सुख घेऊन येणार आहे. या राशीच्या चौथ्या भावात हा राजयोग तयार होणार आहे. या राशीचे लोक जमीन खरेदी करू शकतात. या राशीचे लोक आपल्या आई-वडिलांसोबत चांगला वेळ घालवणार आहेत. चंद्राच्या स्थितीनुसार आई-वडिलांचे आरोग्यही चांगले राहणार आहे.

सिंह रास

या राशीत दुसऱ्या भावात गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. धन या अर्थाने या राजयोगाच्या निर्मितीमुळे उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होणार आहेत. तुम्ही कर्जापासून मुक्त होऊ शकता. आयुष्यात आनंद येऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RITES Recruitment: सरकारी नोकरीची संधी! RITES मध्ये भरती सुरु; पगार किती? अर्ज कसा करावा? वाचा सविस्तर

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्षाचा भडका, दोन्ही देशांकडून तुफान गोळीबार

Modi Cabinet Meeting : मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन टप्प्यात होणार जनगणना, 11 हजार 718 कोटींचा बजेट मंजूर

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Jahnavi Killekar Photoshoot: निळं आकाश अन् निळी बिकनी, जान्हवीचे बोल्ड फोटो पाहून थायलंडचं वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT