Horoscope saam tv
राशिभविष्य

Gajkesari Rajyog: मिथुन राशीत बनणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळणार अचानक पैसा

Gajkesari Rajyog 2025: ज्योतिषांच्या मते, लवकरच मिथुन राशीत गजकेसरी राजयोग तयार होत आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि त्याचा प्रभाव थेट राशींवर होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषात नवग्रहांमध्ये गुरुला खास स्थान देण्यात आलेलं आहे. यामध्ये गुरु वर्षातून फक्त एकदाच राशी परिवर्तन करतात. मात्र यावर्षी ते अतिचारी गतीने भ्रमण करत असल्याने मिथुन राशीसोबत काही काळ कर्क राशीतही राहिले. आता 5 डिसेंबर रोजी गुरु बृहस्पति वक्री अवस्थेत पुन्हा मिथुन राशीत गेले आहेत. त्याच संध्याकाळी चंद्रही मिथुन राशीत पोहोचणार आहे. या दोन्ही ग्रहांची युती मिळून अत्यंत शक्तिशाली गजकेसरी राजयोग तयार होणार आहे.

मिथुन राशीत तयार होणारा हा गजकेसरी योग सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम करणार आहे. मात्र यावेळी ३ राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा खास परिणाम होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कन्या रास (Kanya Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी गुरु-चंद्राची युतीने तयार होणारा गजकेसरी राजयोग अत्यंत लाभदायी ठरणार आहे. अनेक नवीन यश मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळणार आहेत. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. नवीन गुंतवणुकीची योजना करत असाल, तर ही वेळ भविष्यात चांगला फायदा देणारी ठरणार आहे.

मीन रास

मीन राशीसाठी देवगुरु बृहस्पति प्रबल योग तयार ग्रह आहेत. या योगामुळे काही काळ विद्यार्थी अभ्यास आणि संशोधनात यशस्वी होणार आहेत. त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. अध्यात्माकडे तुमचं मन वळण्याची दाट शक्यता आहे. नवीन नोकरीच्या संधीही उपलब्ध होतील.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीच्या कुंडलीत गुरु आणि चंद्र अष्टम भावात फिरणार आहेत. त्यामुळे गजकेसरी राजयोग या राशीच्या व्यक्तींसाठी विशेष ठरणार आहे. नशिबाची चांगली साथ मिळणार असून समजून घेण्याची क्षमता वाढणार आहे. विवाहयोग्य व्यक्तींना प्रस्ताव मिळतील. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दुबई मरीना बीचचा रोमांच जुहू समुद्रकिनारी अनुभवता येणार

Dal Bhaji Recipe : विदर्भात बनवतात तशी चमचमीत डाळ भाजी, हिवाळ्यात एकदा ट्राय कराच

जीवाशी खेळ! पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना; पोलिसांकडून कारवाईत १ कोटींचा मुद्देमाल जप्त

Akola News: अकोल्यात विद्यार्थ्यांकडून पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे? व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Navale Bridge: एक चूक पडेल महागात! नवले पुलावरील अपघातांनंतर मोठा निर्णय, पुणे पोलिसांकडून नवीन नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT