Mahalakshmi Yog saam tv
राशिभविष्य

Mahalakshmi Yog: उद्यापासून 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; महालक्ष्मी योगामुळे होणार धनलाभ

Mahalakshmi Yog 2024: चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्राचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होतो.

Surabhi Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये चंद्राला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह आहे. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्राचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होतो. यामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. असं मानण्यात येतं की, प्रत्येक राशीच्या लोकांवर एका महिन्यात 15 दिवस चंद्राचा शुभ आणि 15 अशुभ प्रभाव पडतो.

नोव्हेंबर महिन्यात चंद्राने वृषभ राशीत गुरूशी संयोगा केला होता, त्यामुळे गजकेसरी योग तयार झाला. 20 तारखेला चंद्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. जिथे मंगळ आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत मंगळ आणि चंद्राचा संयोग होणार असल्याने महालक्ष्मी राजयोग तयार होतोय. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे.

वैदिक पंचांगानुसार, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.46 वाजता कर्क राशीत प्रवेश करणार आहे. याठिकाणी मंगळ स्थित असून महालक्ष्मी योग तयार होतोय.

वृषभ रास

या राशीच्या तिसऱ्या घरात महालक्ष्मी योग तयार होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना बंपर फायदा मिळणार आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे तुम्हाला आता यश मिळू शकणार आहे. या काळात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. तुम्ही नोकरी बदलू शकता. आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठीही महालक्ष्मी राजयोग फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये भरपूर फायदा मिळू शकतो. मुलांच्या बाजूने तणावमुक्त राहता येणार आहे. शेअर बाजारातून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.

कन्या रास

या राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. या राशीच्या व्यक्तींना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही तुमच्या मेहनतीच्या बळावर पुढे जाणार आहात. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदा होऊ शकणार आहे. आर्थिक संकटातून सुटका मिळू शकणार आहे. तुमचं आरोग्यही चांगले राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Miss Universe 2024: अवघ्या २१ वर्षीय डेनमार्कच्या व्हिक्टोरिया केजरने पटकावला मिस युनिव्हर्स २०२४ चा किताब; सोशल मीडियावर चर्चा

Virat Kohli Record: पर्थ कसोटीत विराट रचणार इतिहास! अवघ्या २१ धावा करताच दिग्गजांना मागे सोडणार

Viral Video: शेवटी आई ती आईच! समुद्रात वाहून जाणाऱ्या लेकीला वाचवले, थरार घटना कॅमेऱ्यात कैद

Aai Tuljabhavani: आई तुळजाभवानी मालिकेत उलगडणार नवा अध्याय, देवीने स्पर्श केलेला चिंतामणी पाषाणाचा अद्भुत महिमा

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात

SCROLL FOR NEXT