Kendra Yog saam tv
राशिभविष्य

Kendra Yog 2025: उद्यापासून या राशींच्या नशीबाची दारं उघडणार; न्याय देवता शनी बनवणार पॉवरफुल योग

Kendra Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शनीदेव हा न्यायाचा देव मानला जातो. मेहनत, शिस्त आणि संयम यांना शनीदेव नेहमीच फळ देतात. उद्यापासून शनीदेव एक शक्तिशाली शुभ संयोग निर्माण करणार असून काही राशींना याचा विशेष लाभ मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात, दंड देणारा शनि हा सर्वात प्रभावशाली आणि कडक ग्रह मानण्यात येतो. शनि हा सर्व राशींमध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. जवळजवळ अडीच वर्षांनी शनी त्याच्या राशीत बदल करतो. सध्या शनी मीन राशीत असून या काळात, शनीचा इतर ग्रहांशी असलेला युती किंवा दृष्टिकोन अनेक महत्त्वाचे योग निर्माण करेल.

अशातच शनीचा ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाशी युती होणार असून केंद्र योग निर्माण होणार आहे. यामुळे सर्व १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ३० डिसेंबर रोजी दुपारी १२:४३ वाजता शनि आणि बुध एकमेकांपासून ९० अंशांवर असणार आहेत. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

या योगामुळे अनेक नवीन संधी देखील मिळू शकतात. कुटुंबात शांती आणि आनंद राहील आणि भौतिक सुखसोयी मिळू शकतात. करिअरमध्ये महत्त्वपूर्ण फायदे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या नोकरीसाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो, ज्याचा भविष्यात सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि तुम्ही अधिक बचत करू शकाल.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी केंद्र योग अनेक प्रकारे विशेष असणार आहे. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात.

मीन रास

मीन राशीच्या जातकांसाठी शनि-बुध केंद्र योग अनेक प्रकारे विशेष ठरणार आहे. या राशीच्या लोकांसाठी चांगल्या संधी चालून येणार आहेत. करिअरमध्येही लक्षणीय फायदा होऊ शकणार आहे. व्यवसायातही नफा निर्माण होत आहे. तुम्हाला अधिक नफा मिळू शकणर आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात ठाकरे गट आणि काँग्रेसची युती जाहीर

Thyroid treatment: ना टाका, ना वेदना, ना ऑपरेशन...! 'या' अत्याधुनिक उपचाराने थायरॉईडवर कायमची मात

BMC Election : मुंबईतून पहिली बंडखोरी! मनसे नेत्या अनिशा माजगावकर अपक्ष निवडणूक लढवणार

Silver Jewellery Benefits: चांदीचे दागिने घालण्याचे फायदे काय?

Akshaye Khanna: 'सनकी, सर्वांचा अपमान करतो...'; 'या' दिग्दर्शकाने अक्षय खन्नावर केले गंभीर आरोप, म्हणाला...

SCROLL FOR NEXT