Shukra Gochar saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar 2025: मौनी अमावास्येपासून 'या' ३ राशींचं भाग्य चमकणार; शुक्राच्या गोचरमुळे नोकरी-बिझनेसमध्ये मिळणार पैसा

Shukra Gochar 2025 Positive Impact: धार्मिक मान्यतांनुसार, या दिवशी स्नान केल्याने सर्व पाप धुऊन जातात. तर मौनी अमावस्येच्या एक दिवस आधी म्हणजेच आज शुक्र ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

उद्या मौनी अमावास्या असून हिंदू धर्मामध्ये ही खूप खास मानली जातेय. मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025 रोजी आहे. या दिवशी गंगास्नान, पूजन आणि दान याला महत्त्व आहे. या दिवशी महाकुंभाचं दुसरे अमृतस्नानही होणार आहे. धार्मिक मान्यतांनुसार, या दिवशी स्नान केल्याने सर्व पाप धुऊन जातात. तर मौनी अमावस्येच्या एक दिवस आधी म्हणजेच आज शुक्र ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला आहे.

शुक्र ग्रहाने 28 जानेवारी रोजी सकाळी 7:02 वाजता मीन राशीत प्रवेश केला आहे. ही स्थिती 31 मे पर्यंत राहणार आहे. त्यानंतर शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र 2 मार्च रोजी वक्री होईल आणि 13 एप्रिल रोजी पुन्हा मार्गी होणार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये मीन राशीतील शुक्राचे गोचर विशेष मानलं जातं.

मीन राशीत शुक्राच्या गोचरमुळे काही राशीच्या लोकांचे नशीब उजळणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे काही राशींना करियरमध्ये चांगली संधी मिळण्याचे संकेत आहेत. तर काही राशींच्या व्यक्तींना या काळात एखादी चांगली बातमी किंवा परदेश प्रवास करायला मिळू शकतो. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींची चांदी होणार आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचं गोचर खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकणार आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध सुधारणार आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतर सहकाऱ्यांची मदत मिळणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांना शुक्र गोचरदरम्यान करिअरमध्ये प्रगती होणार आहे. जर तुम्ही कोणत्याही परदेशी कंपनीशी किंवा प्रकल्पाशी संबंधित असाल तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकता.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ सुख-सुविधांमध्ये वाढीचा असणार आहे. या काळात संपत्तीत वाढ होणार आहे. व्यावसायिकांसाठी वेळ पूर्वीपेक्षा चांगला जाणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. प्रेमळ नात्यात नवीनता येणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT