Shukra Gochar saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar: 12 मार्चपासून 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र गोचरमुळे आर्थिक स्थिती सुधारणार

Shukra Gochar 2025: काही ग्रह गोचरप्रमाणे नक्षत्रामध्ये देखील बदल करतात. येत्या काळात शुक्र ग्रह त्याच्या नक्षत्रामध्ये बदल करणार आहे. राहू आणि शुक्र यांच्यात मैत्रीचं नातं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह जेव्हा जेव्हा त्यांच्या राशीमध्ये बदल करतात, तेव्हा सर्व राशींच्या व्यक्तींवर त्याचा परिणाम होत असतो. यावेळी काही ग्रह गोचरप्रमाणे नक्षत्रामध्ये देखील बदल करतात. येत्या काळात शुक्र ग्रह त्याच्या नक्षत्रामध्ये बदल करणार आहे.

शुक्र ग्रह करणार गोचर

12 मार्च 2025 रोजी शुक्र शतभिषा नक्षत्रात भ्रमण करणार आहे. राहू ग्रह हा शतभिषा नक्षत्राचा स्वामी मानला जातो. याशिवाय राहू आणि शुक्र यांच्यात मैत्रीचं नातं आहे. अशा परिस्थितीत राहूच्या नक्षत्रातील बदलामुळे काही राशींचे नशीब उजळू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या आयुष्यात अचानक आनंद येणार आहे. तर काहींना या काळात चांगलं यश मिळणार आहे.

मेष रास

शुक्र ग्रहाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला विविध स्रोतांद्वारे पैसे मिळण्याची संधी मिळणार आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. तुमच्या नियोजित योजना यशस्वी होऊ शकतात.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाच्या नक्षत्रातील बदल फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात वाढ दिसून येणार आहे. कामाच्या ठिकाणीही परिस्थिती तुमच्या बाजूने असणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. या काळात तुम्हाला आर्थिक जीवनात समृद्धी मिळण्याची चिन्ह आहेत.

तूळ रास

शुक्र ग्रहाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या नोकरदारांसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे. यासोबतच अनेक लोकांचा धर्माकडे कल वाढणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंद वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आर्थिक लाभ होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT