Navpancham Rajyog saam tv
राशिभविष्य

Navpancham Rajyog: 15 जानेवारीपासून चमकणार या राशींचं भविष्य; 10 वर्षांनी तयार होणार नवपंचम राजयोग देणार पैसा

Navapancham Rajyog astrology predictions: ज्योतिषशास्त्रानुसार १५ जानेवारीपासून एक विशेष नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. हा योग १० वर्षांनंतर पुन्हा येत असून त्याचा प्रभाव काही राशींवर अत्यंत शुभ ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक कॅलेंडरनुसार, २०२६ च्या सुरुवातीला अनेक ग्रह त्यांच्या राशीत गोचर करणार आहेत. यामुळे नवपंचम आणि समसप्तक राजयोग तयार होणार आहे. या राजयोगांचा सर्व राशींच्या जीवनावर काही ना काही परिणाम होण्याची शक्यता असते. १५ जानेवारी रोजी बुध आणि युरेनस एकमेकांपासून १२०° च्या कोनीय अंतरावर स्थित असणार आहेत. ज्यामुळे हा शुभ योग निर्माण होईल.

या योगाच्या निर्मितीच्या वेळी बुध मकर राशीत असेल आणि युरेनस वृषभ राशीत असणार आहे. अशा परिस्थितीत, नवपंचम राजयोगाची निर्मिती काही राशींचं भाग्य उजळवू शकणार आहे. नवीन नोकरी आणि प्रचंड आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

मकर रास

नवपंचम राजयोगाच्या निर्मितीमुळे मकर राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस येऊ शकणार आहेत. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. यावेळी तुम्ही अडकलेले पैसे परत मिळवू शकता. पगारवाढीचे संकेत आहेत. तुमच्या कौटुंबिक जीवनातही आनंद आणि शांती नांदणार आहे.

मिथुन रास

नवपंचम राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होणार आहे. या काळात जुन्या गुंतवणुकी आणि योजनांमधून नफा मिळण्याची शक्यता आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या तुमच्यासाठी नवपंचम राजयोग सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुमचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढू शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येणार आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वातही सुधारणा होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; या तारखेला करणार युतीची घोषणा

Ladki Bahin Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय लाडक्या बहिणींना मिळणार २५ लाखांचे कर्ज; सरकारची योजना आहे तरी काय?

Green Chilli Fry Recipe : जेवणासोबत तोंडी लावायला ही तिखट मिरची फ्राय एकदा करुनच बघा, वाचा रेसिपी

Pune : पुण्यातील नामांकित कॉलेज बाहेर रॅगिंग, विद्यार्थ्याला चौघांकडून बेदम मारहाण; थरारक VIDEO समोर

नगरपालिका निवडणुकीत मंत्र्यांचे बालेकिल्ले ढासळले, ११ ठिकाणी भाजपचा दारुण पराभव; कोणत्या नेत्यांना फटका बसला?

SCROLL FOR NEXT