Navpancham Rajyog saam tv
राशिभविष्य

Navpancham Rajyog 2024: २ डिसेंबरपासून 'या' राशींचं नशीब चमकणार; करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात दुप्पट लाभ

Navpancham Rajyog 2024: शुक्रासोबत नवपंचम राजयोग निर्माण करतोय. या राजयोगाच्या निर्मितीमुळे या तीन राशींना मोठा लाभ मिळू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला खास महत्त्व असून शुक्र ग्रहाला देखील खास स्थान देण्यात आलं आहे. शुक्राच्या राशीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशींवर होत असतो. याशिवाय दुसरीकडे सध्या युरेनस वृषभ राशीमध्ये स्थित आहे. अशा स्थितीत तो शुक्रासोबत नवपंचम राजयोग निर्माण करतोय. या राजयोगाच्या निर्मितीमुळे या तीन राशींना मोठा लाभ मिळू शकतो.

कधी तयार होतो नवपंचम राजयोग?

जेव्हा हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून 120 अंशांवर एकाच अंशावर म्हणजेच पाचव्या आणि नवव्या स्थानावर असतात नवपंचम योग तयार होतो. हे अत्यंत शुभ मानण्यात येतं. 2 डिसेंबर रोजी रात्री 8.10 वाजता शुक्र आणि युरेनस हे एकमेकांपासून 120 अंशांवर असणार आहेत. यावेळी नवपंचम राजयोग तयार होतंय.

मीन रास

शुक्र आणि युरेनसची युती या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे. करिअरच्या क्षेत्रात पदोन्नतीसह प्रोत्साहन मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्ही बनवलेले धोरण प्रभावी ठरू शकणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि युरेनस यांची युती खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असू शकतो. धार्मिक ठिकाणी जाऊ शकता. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. पैशांच्या बाबतीत सगळी गणितं सुटणार आहेत.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला खूप फायदा होऊ शकणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायातही फायदा होणार आहे. अनावश्यक खर्चाबाबत तुम्ही टाळू शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT