Guru Margi 2025 saam tv
राशिभविष्य

Guru Margi: ४ फेब्रुवारीपासून फळफळणार 'या' राशीचं नशीब; गुरुच्या मार्गी चालीने प्रत्येक कामात मिळणार यश

Guru Margi 2025: देवांचा गुरु बृहस्पति दरवर्षी आपल्या राशीत बदल करत असतो. अशा परिस्थितीत संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी गुरु ग्रहाला 12 वर्षे लागतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. याचप्रमाणे काही ग्रह वक्री आणि मार्ग्रस्थ देखील होतात. असंच देवांचा गुरु बृहस्पति दरवर्षी आपल्या राशीत बदल करत असतो. अशा परिस्थितीत संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी गुरु ग्रहाला 12 वर्षे लागतात. गुरु ग्रहाच्या या स्थिती बदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर काही ना काही परिणाम करतो.

वैदिक कॅलेंडरनुसार, गुरु सध्या वृषभ राशीमध्ये वक्री अवस्थेत आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच 04 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 03:09 वाजता गुरू मार्गी वृषभ राशीत होणार आहे. वृषभ राशीत गुरु ग्रहाच्या सरळ हालचालीमुळे काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. यावेळी काही राशींच्या आयुष्यात नव्याने आनंद येणार आहे. तर काही राशींना त्यांच्या करियरमध्ये चांगली संधी मिळणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

कर्क रास

या राशीच्या लोकांसाठी गुरु मार्गी असणं खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही खूप दिवसांपासून करत असलेले प्रयत्न आता यशस्वी होणार आहेत. व्यापाराशी संबंधित व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. भरीव रक्कम मिळवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकणार आहात. आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे.

कन्या रास

या राशीच्या नवव्या घरात गुरु मार्गी होणार आहेत. करिअरमध्ये तर तुमच्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येणार आहेत. व्यवसायातही तुम्हाला या काळात भरपूर फायदा होणार आहे. आयुष्यातील प्रदीर्घ समस्या आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे.

धनु रास

या राशीच्या लोकांसाठी गुरूची मार्गी चाल फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्हाला इतर अनेक माध्यमातून बरेच फायदे मिळू शकतात. करिअरच्या क्षेत्रातही तुमचं काम तुम्हाला भरपूर पैसा देऊन जाणार आहे. जीवनात आनंदात झपाट्याने वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Maharashtra News Live Update: जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

Ahilyanagar Crime: मंदिरातील बाथरूममध्ये साधूचं नको ते कृत्य, नग्न अवस्थेत महिलेसोबत आढळला; अहिल्यानगरमध्ये खळबळ

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! तुमचाही पगार दुप्पट होणार? लाभार्थ्यांची संपूर्ण यादी आली समोर

SCROLL FOR NEXT