Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Friday Horoscope : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना अडचणीवर मात करावी लागणार

Friday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांचा वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. तर काहींना अडचणीवर मात करावी लागणार आहे.

Anjali Potdar

पंचांग

शुक्रवार,२१ नोव्हेंबर २०२५, मार्गशीर्ष शुक्लपक्ष,देव दिपावली, मार्तंड भैरव.

तिथी-प्रतिपदा १४|४८

रास-वृश्चिक

नक्षत्र-अनुराधा

योग-अतिगंड

करण-बवकरण

दिनविशेष- १४ प.चांगला

मेष - ठरवेल ते होईल असं म्हटलं तर ते नशीब कोणतं! साध्या साध्या दैनंदिन गोष्टी आहेत त्या सुद्धा रखडण्याची शक्यता आहे.प्रवासही टाळणे. अपघातापासून घातपातापासून खबरदारीचा इशारा आहे.

वृषभ - महत्त्वाची कामे शक्यतो दुपारपूर्वी उरकून घ्या. मात्र कितीही झाले तरी आज कामाच्या ठिकाणी जिद्दीने कार्यरत रहाल. व्यावसायिक जोडीदाराचा भागीदाराचा योग्य तो सहभाग कामाच्या ठिकाणी असेल.

मिथुन - खूप काही ठरवून गोष्टी करूच नका. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. भावनिक आंदोलने होतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. आलेल्या संकटावर मात करून पुढे जावे लागेल.

कर्क- शिव उपासना फलदायी ठरणार आहे. मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. संततीच्या काही अडचणी किंवा प्रश्न असतील तर त्या आज पूर्ण होतील. दिवस चांगला आहे.

सिंह - तुमचे कार्यक्षेत्र आज वाढणार आहे. नवनवीन दिशा आणि आशा यांनी भरलेला आजचा दिवस असेल. अडचणींवर मात करून पुढे जाल.सर्व सुख दारी आले आहेत अशी भावना होईल.

कन्या - एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडेल. स्वतःमधील गट फीलिंगला विशेष केंद्रस्थानी माना. शत्रू पिडा नाही. एक वेगळी जिद्द आणि आत्मविश्वास आज तुमच्यात असेल.

तूळ - मनामध्ये आनंदाचे किरण फुलतील. आनंददायी वातावरण असेल. विविध आर्थिक लाभ होण्याचा आजचा दिवस आहे. घरातील वरिष्ठ व्यक्तीकडून योग्य ते सहकार्य मिळाल्यामुळे दिवस सुकर जाईल.

वृश्चिक - आयुष्यात एखादी घटना अशी घडेल की ज्यामुळे तुमचा उत्साह आणि उमेद वाढणार आहे. मनात ठरवलेल्या गोष्टी करणारच असे ध्येय असेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

धनु - काही ना आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करून सोडतील. वाहने जपून चालवण्याची सावधगिरीचा इशारा आज आहे.खर्च अमाप होईल.त्यामुळे मोजमाप ठेवू नका.

मकर - महत्त्वाचे पत्र व्यवहारात पार पडणार आहेत. जवळचे स्नेहीजन, प्रियजनांच्या सहवासामध्ये आजचा दिवस व्यस्त राहील. धनयोगाला दिवस उत्तम आहे.

कुंभ - प्रॉपर्टी सौख्य चांगले लागणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी मोठ्या लोकांच्या ऊठबस होईल. दिवस चांगला आहे.

मीन - वैचारिक मतपरिवर्तन होण्याचा आजचा दिवस आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत. अडथळे दूर होऊन भाग्यकारक घटना आज घडतील. दिवस चांगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असलेल्या सहर शेखचे प्रभागातील कार्यालय बंद

Gold Rate Today : अखेर सोन्याच्या दरात मोठी घसरण, अक्षय्य तृतीयेला करा खरेदी; 24k, 22k, 18k गोल्डचे ताजे दर

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे १३ दिवस; लाडक्या बहिणींकडे चूक सुधारण्याची शेवटची संधी; ₹१५०० साठी आताच हे काम करा

Rohit Shetty Home Firing Case: रोहित शेट्टीच्या घरावर फायरिंग प्रकरणात मोठी कारवाई; वाँटेड आरोपीला आग्र्यातून अटक

Rohit Sharma: असंभव!!! श्रेयस अय्यरचा सुपरमॅन कॅच पाहून सूर्या-रोहितही थक्क; आयपीएलच्या इतिहासातील खतरनाक झेल

SCROLL FOR NEXT