Grah Gochar  saam tv
राशिभविष्य

Grah Vakri: शनी-शुक्रासोबत ४ ग्रह नव्या वर्षात चालणार वक्री चाल; 'या' राशींची होणार भरभराट, बक्कळ पैसाही मिळणार

Grah Vakri 2025: काही ग्रह गोचरप्रमाणे त्यांच्या वक्री आणि मार्गी देखील होतात. नवीन वर्षात म्हणजेच 2025 मध्ये शनि, शुक्र, बुध आणि गुरू हे ग्रह वक्री होणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, अनेक ग्रह त्यांच्या राशीमध्ये एका ठराविक काळातनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह गोचरप्रमाणे त्यांच्या वक्री आणि मार्गी देखील होतात. आता काही दिवसांतच नवीन वर्ष सुरु होणार आहे. या नवीन वर्षात कोणते ग्रह वक्री चाल चालणार आहेत, ते पाहूयात.

ग्रहांचं गोचर, वक्री आणि मार्गी हालचाल यांना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. नवीन वर्षात म्हणजेच 2025 मध्ये शनि, शुक्र, बुध आणि गुरू हे ग्रह वक्री होणार आहेत. त्यामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या ग्रहांचा आणि राशींचा समावेश आहेत ते जाणून घेऊयात.

हे ग्रह चालणार वक्री चाल

  • शुक्र वक्री- 2 मार्च 2025, रविवार सकाळी 06:04 वाजता

  • बुध वक्री- 15 मार्च 2025, शनिवार दुपारी 12:15 वाजता

  • शनि वक्री- 13 जुलै 2025, रविवार सकाळी 09:36 वाजता

  • बृहस्पति वक्री- 11 नोव्हेंबर 2025, मंगळवारी रात्री 10:11 वाजता

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष चांगलं असणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवल्याने तुमचं नातं अधिक फुलणार आहे. जे दीर्घकाळापासून काम करतायत त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांच्या कामात रात्रंदिवस प्रगती होणार आहे. तुमची अनेक स्वप्न नवीन वर्षात पूर्ण होऊ शकणार आहेत.

कर्क रास

नऊ ग्रहांच्या विशेष आशीर्वादामुळे कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद येणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं वेळेत पूर्ण होणार आहेत. कार घेण्याचं तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. अविवाहित लोक परदेशात जाऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष खूप खास असणार आहे. 2025 पासून व्यावसायिकांना स्वतःच्या नावावर घर खरेदी करता येणार आहेत. ज्या लोकांचे आई-वडील बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या लग्नासाठी शोधत आहेत त्यांना येत्या काही दिवसांत चांगली बातमी मिळू शकते. नुकतंच लग्न झालेल्या लोकांच्या घरी नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT