Budh Gochar 2024 negative effect saam tv
राशिभविष्य

Budh Gochar : पुढचे ११ दिवस 'या' राशींनी रहावं सतर्क; कामाच्या ठिकाणी त्रासासोबत होऊ शकते धनहानी

Budh Gochar 2024 negative effect: धन आणि वाणीचा कारक मानल्या जाणाऱ्या बुध ग्रहाने सप्टेंबर महिन्यात गोचर केलं आहे. बुध ग्रहाच्या या गोचरमुळे काही राशींवर याचा विपरीत परिणाम होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह म्हणजे बुध ग्रह. बुध ग्रह तब्बल २१ दिवसांनी त्याच्या राशीमध्ये बदल करतो. सप्टेंबर महिन्याच्या ४ तारखेला बुध ग्रहाने गोचर केलं होतं.

यानंतर आता २३ सप्टेंबर रोजी बुध ग्रह पुन्हा गोचर करणार आहे. सध्या बुध ग्रह सिंह राशीत असून त्यानंतर तो कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान बुधाचं सिंह राशीतील गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी नकारात्मक परिणाम देणारं ठरणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

कर्क रास

बुध ग्रहाचं गोचर या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार नाही. तुम्हाला या काळात पैशांचा हिशोब लागणार नाही. तुमचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. या काळात वाद देखील होऊ शकतात.

वृश्चिक रास

बुधाचं गोचर तुमच्यासाठी नुकसान दायक ठरण्याची शक्यता आहे. तुमची धनहानी या काळात होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. कोर्टाची केस मागे लागू शकते

मकर रास

बुध ग्रहाचं गोचर तुमच्यावर नकारात्मक परिणाम टाकू शकते. या काळात गाडी चालवताना काळजी घ्यावी. तुमच्या मनाजोग्या गोष्टी घडल्या नसल्याने तुमची अधिक चिडचिड होऊ शकते.

मीन रास

बुध ग्रहाचं गोचर तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात खूप त्रासदायक ठरू शकतं. तुमच्याविरूद्ध कोणीतरी कट रचू शकतं. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्याकडून पैसे हरवू शकतात.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

SCROLL FOR NEXT