Weekly Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: कौटुंबिक समस्यांवर तोडगा निघेल, आर्थिक उलाढाली होतील; पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Which zodiac signs get money this week: हा आठवडा काही राशींसाठी विशेष शुभ फलदायी ठरणार आहे. ग्रह-नक्षत्रांची स्थिती या आठवड्यात अशा प्रकारे बदलणार आहे की, काही राशींच्या लोकांना कौटुंबिक जीवनात सुख-शांतीचा अनुभव मिळेल

Surabhi Jayashree Jagdish

मेष

चतुर्थातील रवीचे भ्रमण घर, जागा, वाहन खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी अनुकूल राहील, सप्ताहात मित्र, सहकारी वर्गाशी समज-गैरसमज संभवतात. हितशत्रूवर विजय मिळेल. सहली छोटे प्रवास होतील.

वृषभ

नोकरीसाठी छोटे प्रवास घडविणारा कालखंड आहे. कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. तीर्थयात्रा, सहली होतील. सप्ताहात नोकरी, व्यवसायात गोंधळाची स्थिती राहील. वरिष्ठांशी समज-गैरसमज होतील.

मिथुन

सप्ताहात आर्थिक उलाढाली होतील. वारसा हक्काची कामे होतील. कौटुंबिक समस्यांवर तोडगा निघेल. वरिष्ठांकडून होणारी मनमानी सहन करावी लागेल, उद्योगधंद्यांत मंदीसारखी स्थिती राहील.

कर्क

राजकीय सामाजिक क्षेत्रात मोठे पद, प्रतिष्ठा मिळेल, तरुणांचे विवाह जमतील. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवास जपून करावेत. दूरचे प्रवास, परदेशगमनाचे बेत आखाल. गुरुजनांचा सहवास लाभेल.

सिंह

कर्जाची कामे होतील, घर, वाहन यासाठी खर्च होतील. नवीन नोकरीची संधी मिळेल. सप्ताहात तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीतील व्यवसायाची संधी मिळेल. मानसिक स्थिती खराब राहील.

कन्या

मोठ्या व्यक्तीच्या ओळखी, गाठीभेटी होतील. सरकारी कामात यश मिळेल. शेअर्ससारख्या व्यवसायात फायदा होईल. भागीदारीमध्ये नुकसान संभवते.

तूळ

दशमातील रवीचे आगमन अधिकार वाढविणारे असून, नोकरीत प्रमोशन होईल. राजकीय क्षेत्रात मोठे पद मिळेल. प्रतिष्ठा, मानसन्मान वाढेल. नवीन नोकरी, व्यवसायाची संधी मिळेल. वास्तू सौख्य मिळेल.

वृश्चिक

गुरुजनांचा सहवास लाभेल. नातेवाइक, भावंडांचा सहवास लाभेल. प्रसिद्धी, पुरस्कार मिळेल. सप्ताहात घर, जागेची कामे मार्गी लागतील. वडिलोपार्जित वारसाहक्काच्या कामातून लाभ होतील.

धनू

पुढील महिन्यात मोठे प्रवास टाळावेत. पथ्यपाणी पाळावे. पैशाची कामे होतील. मोठी गुंतवणूक होईल. छोटे प्रवास, सहली होतील. घरातील वातावरण अशांत राहील. ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. मन अशांत राहील.

मकर

भागीदारीमध्ये नवीन व्यवसायाची संधी मिळेल. जोडीदाराला अधिकार मिळतील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्याल. नोकरीत वेतनवाढ होईल. हाताखालच्या लोकांचे चांगले सहकार्य राहील. कोर्टकचेरी टाळावी.

कुंभ

षष्टातील रवीचे आगमन पुढील महिन्यात नवीन नोकरी मिळण्यासाठी अनुकूल राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील, मोठे कर्ज मंजूर होईल. सप्ताहात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

मीन

शेअर मार्केट, म्युच्यूअल फंडामध्ये गुंतवणूक कराल, मित्र, सहकारी यांची मदत होईल. सप्ताहात मोठे खर्च होतील. दूरचे प्रवास कराल. मात्र, उत्तरार्धात शारीरिक, मानसिक स्वास्थ्य खराब राहील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

Maharashtra Politics: भाजपचा हा सर्वात मोठा डाव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केट धडाम! सेनसेक्स, निफ्टीमध्ये घसरण

SCROLL FOR NEXT