Surya Grahan 2024 Negative Effect saam tv
राशिभविष्य

Surya Grahan 2024 : पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवसावर ग्रहणाचं सावट; 'या' राशींसाठी सूर्य ग्रहण ठरणार अशुभ

Surya Grahan 2024 Negative Effect: 2024 सालातील शेवटचं सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. हे सूर्य ग्रहण कन्या राशीत लागणार असून या ग्रहणामुळे काही व्यक्तींच्या आयुष्यात मोठी हानी होण्याचा धोका आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नुकतंच चंद्र ग्रह लागलं होतं. यंदाच्या वर्षातील हे शेवटचं चंद्र ग्रहण होतं. तर आता आगामी काळात सूर्य ग्रहण लागणार आहे. हे सूर्य ग्रहण यंदाच्या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्य ग्रहण असणार आहे. हे सूर्य ग्रहण कन्या राशीत लागणार असून या ग्रहणामुळे काही व्यक्तींच्या आयुष्यात मोठी हानी होण्याचा धोका आहे.

कधी लागणार आहे सूर्य ग्रहण

2024 सालातील शेवटचं सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात 2 ऑक्टोबर रोजी रात्री 09:13 वाजता सुरू होणार असून ते मध्यरात्री 03:17 वाजता संपणार आहे. या वेळी कोणत्या राशींना त्रास सहन करावा लागू शकतो ते पाहूया.

मेष रास

मेष राशीच्या व्यक्तींना सूर्य ग्रहणामुळे वैवाहिक तसंच लव्ह लाईफमध्ये समस्या येऊ शकतात. यावेळी तुमचं नातं तुटण्याचाही धोका आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होऊ शकतो.

मिथुन रास

या राशींच्या व्यक्तींवर सूर्य ग्रहणाचा निगेटिव्ह परिणाम होणार आहे. या काळात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना सावधान व्हा. तुमच्याकडून धनहानी होण्याचा धोका आहे.

कर्क रास

कर्क राशींच्या लोकांना सूर्य ग्रहण अशुभ सिद्ध होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. कोर्ट-कचेरीची कामं तुमच्या मागे लागू शकतात.ऑनलाईन खरेदीतून तुमच्यासोबत फसवणूक होऊ शकते.

सिंह रास

या काळात प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो. कुटुंबामध्ये मोठे वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्याविरूद्ध कट रचले जाऊ शकतात.

मीन रास

सूर्याचं ग्रह या राशींच्या व्यक्तींसाठी नकारात्मक फळ देणार आहे. तुमच्या घरात वाद होण्याचा धोका आहे. पैशांची देवाणा - घेवाण करताना काळजी घ्या. वैवाहिक जीवनात वाद घालू नका.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime news: धक्कादायक! 'जेवणात चिकन का नाही', पती जोरजोरात ओरडला; वैतागलेल्या पत्नीने विळ्याने चिरला गळा

Riteish Deshmukh Hairstyles: पांढऱ्या केसांपासून ते पोनीपर्यत.. रितेश भाऊच्या 10 हेअरस्टाईने लावलं 'वेड'; PHOTO

Trending Chappal Design : नऊवारी साडी असो नाहीतर वनपीस, फॅशनच्या दुनियेत 'ही' चप्पल कायम १ नंबर

Maharashtra News Live Update: जालन्यात पारा ४२ अंशावर, हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा 'यलो अलर्ट'

Ladki Bahin Yojana eKYC: आधार नंबर टाकूनही ओटीपी येत नाही; लाडक्या बहिणींना ईकेवायसी करताना अडचणी

SCROLL FOR NEXT