Auspicious Yog Saam Tv
राशिभविष्य

Auspicious Yog: दुर्गा अष्टमी आणि दोन शुभ योगांचा संगम; या 4 राशींवर लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद

Durga Ashtami Auspicious Yoga: हिंदू धर्मात नवरात्रीतील दुर्गा अष्टमी किंवा महाअष्टमी या तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुर्गा मातेच्या आठव्या रूपाची, महागौरीची पूजा केली जाते आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

आज ३० सप्टेंबर २०२५ असून मंगळवारचा दिवस आहे. आजच्या दिवशी आश्विन शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे जी धार्मिकदृष्ट्या दुर्गा अष्टमी म्हणून साजरी केली जाते. आजच्या दिवशी “बुधादित्य योग” आणि “शोभन योग” हे शुभ योग तयार झाले आहे. या दोन्ही योगांच्या निर्मितीमुळे शुभ कार्य, पूजा, उपासना अथवा नवीन प्रारंभ करण्यासाठी हा दिवस अनुकूल मानला जातो.

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मानण्यानुसार, अशुभ काळ आणि मुहूर्त लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. याचं कारण त्या काळात मोठी कामं टाळली पाहिजेत. आज सूर्य कन्या राशीत आहे आणि चंद्र धनु राशीत आहे. अशा ग्रहस्थितीमुळे काही राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता दिसून येते.

आजचे पंचांग व शुभ मुहूर्त

  • तारीख: ३० सप्टेंबर २०२५, मंगळवार

  • तिथी: शुक्ल अष्टमी (पूर्ण दिवस) – दुर्गा अष्टमी

  • वार: मंगळवार

  • नक्षत्र: मूल नक्षत्र

  • योग: बुधादित्य योग, शोभन योग

  • चंद्र राशी: धनू

  • सूर्य राशी: कन्या

  • सूर्योदय: सकाळी ६:१९

  • सूर्यास्त: सायंकाळी ६:१२

शुभ मुहूर्त व राहुकाल

  • अभिजित मुहूर्त: सकाळी ११:५३ ते १२:४० ही वेळ शुभ कार्यांसाठी अत्यंत अनुकूल

  • गुलिक काल: सकाळी ८:३० ते १०:००

  • राहुकाल: दुपारी ३:१४ ते ४:४२ या काळात शुभ कार्य टाळावीत

  • ब्राह्म मुहूर्त: सकाळी ४:४६ ते ५:३४

  • दुर्मुहूर्त: सकाळी ८:४३ ते ९:३१ आणि रात्री ११:०३ ते ११:५२

  • वर्ज्य काल: संध्याकाळी ४:३६ ते ६:१९

कोणत्या चार राशींसाठी आजचा दिवस चांगला आहे

मेष (Aries)

बुधादित्य योगामुळे मेष राशीच्या लोकांना लाभ मिळणार आहे. आजच्या दिवशी काही आर्थिक लाभाची शक्यता आहे. उद्योग, व्यवहार आणि खास प्रकल्पांमध्ये यश येण्याची शक्यता आहे.

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल आहे. यावेळी शत्रु तुम्हाला कोणताही त्रास देणार नाहीत. त्याचप्रमाणे या काळात वरिष्ठांकडून पाठिंबा मिळणार आहे. व्यापारी व्यवहार, करार किंवा नोकरी बदलासाठी हालचाली करण्यास योग्य वेळ आहे.

वृषभ (Taurus)

वृषभ राशीचे लोक आज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या लाभ घेऊ शकतील. घरातील आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. व्यावसायिक समृद्धी, प्रतिष्ठेत वाढ आणि कुटुंबातील सौहार्द राहणार आहे.

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष प्रेरणादायी ठरू शकतो. अचानक लाभ, नवे संपर्क, धार्मिक प्रवास किंवा उपक्रमात लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगला लाभ मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Tourism : ट्रेकिंग, ऐतिहासिक ठिकाण अन् शांत निसर्ग; सातपुडा पर्वतरांगेत वसलाय 'हा' किल्ला, पाहाल मनमोहक विहंगम दृश्य

Maharashtra Live News Update : माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

Nana Patekar Video : शाहिद-तृप्तीला उशीर, नाना पाटेकर वैतागून निघून गेले; 'O Romeo'च्या ट्रेलर लाँच दरम्यान नेमकं घडलं काय?

Aloo Tikki Recipe: नाश्त्याला बनवा चटपटीत अन् क्रिस्पी आलू टिक्की; ५ मिनिटांत होईल तयार

Mumbai Horror: मुंबईत विक्रृतीचा कळस, अडीच महिन्याच्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT