Navpancham Rajyog saam tv
राशिभविष्य

Navpancham Yog: गुरु-राहूच्या नवपंचम राजयोगामुळे 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Navpancham Yog Benefits: ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करतात. यावेळी ग्रहांचं गोचर हे प्रत्येक राशीच्या जीवनावर परिणाम करतं. येत्या काळात नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतो. ग्रह एका विशिष्ट अंतराने भ्रमण करून अनेकदा शुभ आणि राजयोग निर्माण करतात. या योगांचा परिणाम प्रत्येक राशींच्या जीवनावर काही ना काही होत असतो.

राहू १८ मे रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर, राहू मिथुन राशीत बसून नवपंचम योग निर्माण करणार आहे. या योगाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र अशा ३ राशी आहेत ज्यांचे नशीब चमकू शकणार आहे. या राशींच्या करियरमध्ये चांगली ग्रोथ मिळणार आहे. तर काहींना पैसे मिळणार आहेत.

मकर रास

नवपंचम राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वय राहण्याची शक्यता आहे. घरात शांती आणि आनंद नांदणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे.

कुंभ रास

नवपंचम राजयोगामुळे कुंभ राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. उच्च शिक्षण किंवा आव्हानात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळणार आहे. आर्थिक नियोजन सुधारेल आणि तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत.

कन्या रास

नवपंचम राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगली प्रगती मिळू शकणार आहे. दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेली बढती मिळू शकते. तुमच्या नियोजित योजना यशस्वी होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतल्या साकीनाका येथे गारमेंट गोदामाला आग

Maharashtra News: विहीर चोरीला गेली, तरुण शेतकऱ्याने शेतातच मृत्यूला कवटाळलं

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांकडे गृहखात्यासह तब्बल २९ खाती; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कोणती मिळाली खाती?

कल्याण RTOची दमदार कामगिरी, ४०० कोटींहून अधिक महसूल जमा

धाड धाड...! विद्यार्थ्याकडून भर वर्गात गोळीबार; ४ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT