Horoscope Today 27th August 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : मेष राशीचे आर्थिक प्रश्न सुटतील; कुंभ राशीच्या लोकांना मिळणार भरभरून प्रेम, वाचा राशीभविष्य

Horoscope Today 27 August 2024 : आज मंगळवार, श्रावण कृष्णपक्ष, गोपाळकाला. तिथी-नवमी २५|३४. मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य जाणून घ्या...

Anjali Potdar

आजचे पंचांग- मंगळवार २७ ऑगस्ट २०२४

श्रावण कृष्णपक्ष,गोपाळकाला. तिथी-नवमी २५|३४. रास-वृषभ २७|४२ नं. मिथुन. नक्षत्र - रोहिणी. योग-हर्षण. करण-तैतिल. दिनविशेष-चांगला दिवस

मेष - आर्थिक प्रश्न सुटतील

काही वेळाला मन खट्टू होते. केलेल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. अशावेळी आपल्याला कुटुंबीयांचा तुम्हाला आधार वाटतो. तो आजचा दिवस आहे. आर्थिक विवांचना असतील तर हळूहळू मार्गी लागतील. निष्काळजी रहा.

वृषभ - आनंद लुटाल

गोपाळकाल्याचा आनंद लुटाल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये हिरीरीने सहभाग घ्याल. आपले व्यक्तिमत्व विकसित होईल.

मिथुन - मनस्ताप टाळा

स्वतःसाठी पैसा खर्च कराल त्यासाठी जगावं असे वाटेल. पुन्हा तापटपणा डोके वर काढेल. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. मनस्ताप टाळा.

कर्क - आनंदाचा दिवस जाईल

आपल्या लोकांबरोबर काही प्रवासाचे योग आखाल. त्यासाठी पैसा खर्च करण्याची तयारी असेल. मित्र-मैत्रिणींबरोबर आनंदाचा दिवस जाईल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल जुन्या ओळखींना नव्याने  पालवी फुटेल.

सिंह - प्रयत्नांना यश मिळेल

राजकारणामध्ये यश आहे. राजकारणी लोकांनी केलेले मसुदे कामी येतील. तुमच्या देखरेखीखाली अनेकांचे नशीब वाढीस लागेल. प्रयत्नांना यश मिळेल.

कन्या -  मन प्रसन्न राहील

गोपाळकाल्याचा विशेष मुहूर्तावर काही चांगल्या गोष्टी कराव्यात असा आजचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. देवावरचा विश्वास गाढ होईल इतक्या चांगल्या घटना घडतील.

तूळ - प्रगतीत अडथळे येतील

प्रगतीमध्ये अडथळे येतील काही केलं तरी नियोजित केलेली कामे साध्य होणार नाहीत. प्रवासामध्ये त्रास होतील वरिष्ठांकडून अडचणी वाढतील.

वृश्चिक - प्रेमात पडण्याचा दिवस

जोडीदाराबरोबरचा अबोला आज संपुष्टात येईल. पुन्हा नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडण्याचा आजचा दिवस आहे. कामे सुकर होतील.

धनु - कामांमध्ये अडथळे येतील

प्रयत्नांची शर्थ करावी लागेल तर मनासारख्या गोष्टी घडतील. कामांमध्ये अडथळे आज ठरलेल्याच आहेत हे लक्षात घेऊन नियोजन करावे.

मकर -  आज सोनेरी दिवस

शिव आणि कृष्ण उपासना आज फलदायी ठरेल. गोपालकाला हा विशेष महत्त्वाचा दिवस आहे. आज तुमच्या उपासनेच्या मार्गातला सोनेरी क्षण आहे त्याचे सोने करा. कामे मार्गी लागतील.

कुंभ -  प्रेमाची वागणूक मिळेल

कोणाकडून तरी प्रेरणा घेऊन नव्याने पुढील गोष्टींचे नियोजन कराल. घरातील ज्येष्ठांकडून प्रेमाची वागणूक मिळेल. कनिष्ठांकडे विशेष लक्ष द्याल. दिवस चांगला आहे.

मीन - पैसा खर्च कराल

घरासाठी पैसा खर्च करण्याचे योग आहेत. डागडूजी, रिनोवेशन किंवा जुने घर खरेदीचे योग आज दिसून येत आहेत. आपला खिसा गरम रहावा अशी योजना करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Infertility treatment: गर्भधारणेमध्ये अडथळा येत असलेल्या महिलांसाठी 'ही' थेरेपी ठरेल आशेचा किरण; पाहा काय आहे ही थेरेपी?

SCROLL FOR NEXT