Horoscope Today 10th August 2024 Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : या राशींच्या लोकांना आज होतील अनेक लाभ, चांगलेपण पडेल पदरात; वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya Today 10th August 2024 : वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेक लाभ होतील. सिंह राशीला दिवस चांगला जाईल, वाचा आजचे तुमचे राशीभविष्य...

Anjali Potdar

आजचे पंचांग - शनिवार, दिनांक १० ऑगस्ट २०२४

श्रावण शुक्लपक्ष. श्रियाळ षष्ठी. सूपोदन. वर्णषष्ठी. तिथी - षष्ठी २९|४६. रास-कन्या १६|१८ नं. तुला. नक्षत्र - चित्रा. योग - साध्य. करण - कौलव. दिनविशेष-चांगला दिवस.

मेष : तापटपणाला आळा घाला

आपल्या स्वभावातील तापटपणाला आज आळा घाला. वाहनांपासून सावधगिरी बाळगण्याचा आजचा दिवस आहे. उष्णतेचे, डोकेदुखीचे विकार वाढतील काळजी घ्या.

वृषभ : भाग्यकारक घटना घडतील

राशीप्रमाणेच मौजमजा करण्यासाठी दिवस घालवाल. मोठे प्रवास होतील. आपल्या आवडीच्या व्यक्तींची भेट होईल. त्यांच्यासोबत एकमेकांच्या आनंदात सहभागी व्हाल. भाग्यकारक घटना घडतील.

मिथुन : चांगलेपण पदरी पडेल

कामासाठी प्रवासाचा आजचा दिवस आहे. Jack of all, master of none अशा अनेक गोष्टी आपल्या बाबतीत घडतात. आज काही ठराविक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करा. तर दिवसातलं अधिक चांगलेपण पदरी पडेल.

कर्क : अचानक लाभ होतील

स्वभावाला औषध नसते हेच खरे. आपल्या स्वभावाप्रमाणे इतरांचे खूप आगत स्वागत कराल. केलेल्या गोष्टींचे लाभ सुद्धा आज होतील. सून जावयांबरोबर दिवस आनंदाचा राहील .

सिंह : परदेशगमनाचे योग आहेत

अनेक मोठ्या गोष्टींचे बेत आखाल. परदेशगमनाचे योग आहेत. मात्र इतरांना देण्यामध्ये आपली झोळी रिकामी होत नाही ना? याचा विचार करा.

तूळ : विशेष निर्णय होतील

वडिलोपार्जित गोष्टींविषयी विशेष निर्णय होतील. कुटुंबीयांबरोबर दिवस चांगला राहील. काही खरेदीचे योग आहेत. विशेष उपासना आणि धार्मिकता याबरोबर कुटुंबतील सदस्यांसोबत सहभागी व्हाल .

वृश्चिक : मोठे आव्हाने स्वीकाराल

कामाचे स्वरूप बदलते राहील. पण परिस्थितीची दोन हात करण्याची ताकत आज येणार आहे. नवीन बेत आणि आखणी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मोठे आव्हाने स्वीकाराल.

धनु : इमोशनल डिपेंडन्सची टाळा

समाधान काय आहे हे शोधण्यामध्ये आजचा दिवस जाईल. खूपदा समाधान हे दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतं हे आपल्याला जाणवतं. म्हणूनच इमोशनल डिपेंडन्सची टाळा. तर दिवस चांगला राहील. स्वतःला कामात गुंतवून घ्या.

मकर : आर्थिक उलाढाली होतील

शेअर्स किंवा इतर आर्थिक गोष्टींमध्ये उलाढाली होतील. पैशाच्या वाटा आणि मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. योग्य आर्थिक नियोजन केल्यास पुढील वाटचाल सुकर होईल.

कुंभ : चांगले काम करा

नको त्या गोष्टीमध्ये वेळ खर्च करू नका. अनेक गोष्टी आपल्या राशी गुणधर्म चांगले आहेत. चांगले काम करा. सकारात्मकता वाढेल. वाईट लोकांपासून सावधगिरी बाळगा. तब्येत सांभाळा.

मीन : कोर्टामध्ये हेलपाटे वाढतील

सरकारी काम आणि कचेरीच्या गोष्टी थोड्या मार्गावर येतील. भागीदाराबरोबर प्रवास होतील. कोर्टामध्ये हेलपाटे वाढतील. कामाचे स्वरूप टांगत्या तलवारी सारखे राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओव्हर फ्लो

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

SCROLL FOR NEXT