Sunday Horoscope In Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope: कभी खुशी कमी गम! संकटाचे सावट; नातेवाईकांची मिळेल साथ, वाढेल मैत्री, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Sunday Horoscope In Marathi : रविवार रोजी एक शक्तिशाली त्रिग्रह योग तयार होत आहे. या शक्तिशाली संयोगात, वृषभ आणि कर्क राशीसह पाच राशींना सूर्यदेवाच्या आशीर्वादामुळे महत्त्वपूर्ण लाभ होतील.

Anjali Potdar

रविवार,२१ सप्टेंबर २०२५,भाद्रपद कृष्णपक्ष,सर्वपित्री दर्श अमावास्या,अमावास्या श्राध्द.

तिथी-अमावास्या २५|२४

रास-सिंह १५|५८ नं. कन्या

नक्षत्र-पूर्वा

योग-शुभयोग

करण-चतुष्पाद

दिनविशेष-अमावास्या वर्ज्य

मेष

अनेक दिवस मनात असलेले धनाशी निगडित योग आज सुफल होतील. असे वाटते मोठ्या गुंतवणुका करायला हरकत नाही. अचानक लॉटरी लाभ संभवतो आहे. गणेश उपासना करावी.

वृषभ

सर्व ऐहिक गोष्टींवर आपले विशेष प्रेम आहे. मग घर असो, गाडी असो, जीवनात मिळणारा पैसा व प्रॉपर्टी असो. आज याच गोष्टींवर आपण विशेष लक्ष केंद्रित करणार आहात आणि त्यातील सर्व सुखांचा उपभोग घ्याल.

मिथुन

आयुष्य नव्याने जगण्याची कला आपल्याला नेहमीच साधते. आज जवळचे काही प्रवास होतील. नव्याने ओळखी होतील. ज्याच्या व्यवसायिक नव्या वाटा तयार होतील. स्वतःमधील उमेद वाढती राहील .

कर्क

न ठरवता काही गोष्टी सहज होणार आहेत. इतके दिवस आपल्या कुटुंबीयांसाठी केलेली मेहनत आज फळाला जाईल. आनंदी वातावरणामध्ये छोटासा समारंभ घरात पार पडेल. रुची वाढेल.

सिंह

स्वतःवरच आत्मविश्वास ढळू न देणे हेच आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. नव्याने काही गोष्टी झपाटून पेटून उठून कामाला लागाल. आपला इतरांवर प्रभाव राहील. त्याचाच फायदा व्यवसायासाठी होणार आहे.

कन्या

नको असणाऱ्या काही गोष्टींचा ससेमिरा आज मागे लागेल. ठरवले ते होईलच असा आजचा दिवस नाही. विनाकारण मनस्ताप होईल. खर्च होईल. मानसिकता सांभाळा.

तूळ

मैत्रीचे बंध नव्याने दृढ होतील. प्रेमामध्ये अश्वस्त असणे आज गरजेचे आहे. नातेवाईकांच्याकडून शेजाऱ्यांच्या कडून अडचणीच्या काळात मदत प्राप्त होईल. दिवस चांगला आहे.

वृश्चिक

"दहा लोकांना एकच शिरजोर" अशी काहीसे आपले व्यक्तिमत्व आहे. सिंहाप्रमाणे लढवय्या वृत्ती घेऊन आज आपल्या कार्यक्षेत्रात तुम्ही वावरणार आहात. बढतीचे योग आहेत. सहकार्याना बरोबर घेऊन चालाल.

धनु

आज अमावस्या चा विशेष योग उपासनेला आपल्या राशीला चांगला आहे. दानधर्म, दानत वाढेल. तीर्थक्षेत्री भेटी होतील. सद्गुरूंची विशेष कृपा आपल्यावर राहिल्यामुळे मनस्वास्थ्य चांगले राहील.

मकर

काही गंडांतर अचानक येण्याची शक्यता आहे. मानसिकता सांभाळावी. तब्येत काळजी घ्यावी. मृत्यू भय दाटेल .काही गूढ गोष्टींमध्ये विशेष रुची वाढेल. दिवस संमिश्र आहे.

कुंभ

अनेक वेळा गाळात जाऊन नव्याने उभारणे आता आपल्याला सहज शक्य होत आहे. संशोधनात्मक कार्यातही गती आज आपल्याला मिळेल. जुन्या गोष्टींचा पाठपुरावा करून नव्याने यश मिळवाल. दिवस चांगला आहे.

मीन

अमावस्या थोडी घातक आज ठरेल असे वाटते आहे. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. हित शत्रूंचा त्रास संभवतो आहे. आपले कोण आणि परके कोण हे ओळखून पुढे जावे. नोकरीमध्ये मात्र गती आणि प्रगती दोन्ही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT