Chaturgrahi Yog 2025 Saam Tv
राशिभविष्य

Chaturgrahi Yog: 2025 मध्ये बनणार चतुर्ग्रही योग; 'या' राशी जगणार राजासारखं आयुष्य, बक्कळ पैसाही मिळणार

Chaturgrahi Yog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली राशी बदलतो. ज्याचा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर परिणाम होत असतो. पुढच्या वर्षी मार्च महिन्याच्या 14 तारखेला चतुर्ग्रही योग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नवीन वर्ष सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहे. नव्या वर्षात अनेक ग्रह त्यांच्या राशीत आणि स्थितीत बदल करणार असल्याचं ज्योतिष्य शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली राशी बदलतो. ज्याचा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर परिणाम होत असतो.

नवीन वर्ष 2025 मध्ये काही राशीच्या लोकांना बरेच फायदे मिळू शकणार आहेत. मार्च महिन्याच्या 14 तारखेला चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. ज्याचा 12 राशींच्या जीवनावर परिणाम होऊ शकणार आहे. होळीच्या दिवशी चतुर्ग्रही योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकणार आहे.

वैदिक दिनदर्शिकेनुसार राहू ग्रह आधीच मीन राशीत आहे. यासोबतच १४ मार्चला सूर्य या राशीत २७ फेब्रुवारीला बुध आणि २८ जानेवारीला शुक्राची उपस्थिती असणार आहे. अशा स्थितीत २७ फेब्रुवारीला त्रिग्रही योग तर १४ मार्चला चतुर्ग्रही योग तयार होतोय. होळीच्या दिवशी शुभ योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना बरेच फायदे मिळू शकणार असून कोणत्या राशींच्या व्यक्तींना यावेळी लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग खूप फायदेशीर असणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकणार आहेत. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. नोकरीत बढतीसोबतच तुमच्या कामाची प्रशंसा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमचं स्थान बदलण्याची संधी देखील मिळू शकणार आहे. वैवाहिक जीवनात फक्त आनंदच राहणार आहे.

मीन रास

या राशीच्या चढत्या घरात चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. बौद्धिक क्षमता वाढणार आहे. सूर्यदेवाच्या कृपेने नोकरी-व्यवसायात अपार यश मिळण्याची त्याचप्रमाणे मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला खूप फायदा होण्याची शक्यता आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग देखील खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असू शकते. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला विशेष लाभ मिळू शकणार आहे. नोकरीमुळे तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो. तुम्हाला बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. सूर्यदेवाच्या कृपेने तुम्हाला व्यवसायातही भरघोस नफा मिळू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी रुग्णालयात मोठा घोटाळा! बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात बड्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT