Chaturgrahi Yog 2025 saam tv
राशिभविष्य

Chaturgrahi Yog: 50 वर्षांनंतर बनणार चतुर्ग्रही योग; 3 राशींवर राहणार गुरु-शुक्राची कृपा, मिळणार धनलाभ

Chaturgrahi Yoga In Mithun: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे विशिष्ट योग आणि युती मानवी जीवनावर मोठे परिणाम करतात. 'चतुर्ग्रही योग' म्हणजे जेव्हा चार ग्रह एकाच राशीत येतात. ५० वर्षांनंतर असा दुर्मिळ योग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी एका राशीत अनेकदा दोन किंवा त्याहून अधिक ग्रहांचा प्रवेश होतो. यावेळी इतर ग्रहांशी युती करून चतुर्ग्रही आणि त्रिग्रही योग तयार करतात. ज्याचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम दिसून येतो.

यामध्ये चतुर्ग्रही योग २६ जून रोजी तयार होणार आहे. हा योग गुरु, बुध, चंद्र आणि सूर्य देवाच्या युतीने तयार होणार आहे. ज्यामुळे काही राशींसाठी धन, संपत्ती, प्रगती आणि यशाचा मार्ग खुला होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

तूळ रास

चतुर्ग्रही योग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. यासोबतच तुम्हाला तुमचं करिअर आणि व्यवसाय पुढे नेण्याच्या संधीही मिळू शकणार आहे. यासोबतच धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमची आवड वाढणार आहे. तुम्ही देशांतर्गत आणि परदेशात प्रवास देखील करू शकता. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे.

मीन रास

चतुर्ग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या सुखसोयी आणि सुविधा वाढू शकतात. मित्र आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळणार आहे. मोठी ध्येयं साध्य करण्यासाठी आणि नवीन योजना आखण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे.

मिथुन रास

चतुर्ग्रही योगाच्या निर्मितीसह मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. तुम्हाला नोकरी आणि कामात प्रगती मिळेल. कामाच्या ठिकाणी लाभ मिळणार आहे. भागीदारीचे काम करणाऱ्यांना लाभ मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT