October 2024 Grah Gochar saam tv
राशिभविष्य

October 2024 Grah Gochar: ऑक्टोबर महिन्यात ६ ग्रहांच्या स्थिती बदलाने ओढावणार संकट; धनहानीसोबत आरोग्याची समस्या सतावणार

October 2024 Grah Gochar: ऑक्टोबर महिन्यात 9 पैकी 6 ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. काही राशींना या ग्रहांच्या स्थिती बदलांच्या नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यात ग्रहांचं गोचर होतं. येत्या आगामी ऑक्टोबर महिन्यात देखील काही ग्रहांचं गोचर होणार आहे. यावेळी 9 पैकी 6 ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. दरम्यान या ग्रहांच्या गोचरमुळे काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

कोणत्या ग्रहांच्या स्थितीत होणार बदल?

ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर महिन्यात शनी मूळ त्रिकोण कुंभ राशीत असणार आहे. केतू कन्या राशीत असणार आहे. याशिवाय राहु मीन राशीत असणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.25 वाजता बुध तूळ राशीत प्रवेश करणार आहे आणि गुरु ग्रह देखील त्याच्या वक्री चाल चालणार आहे. दुसरीकडे मंगळ 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:46 वाजता कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य 17 ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. १३ ऑक्टोबर रोजी शुक्र वृश्चिक राशीत गोचर करणार आहे.

दरम्यान ग्रहांच्या या स्थिती बदलाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. मात्र यावेळी काही राशींना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. काही राशींना या ग्रहांच्या स्थिती बदलांच्या नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मेष रास

या राशींच्या व्यक्तींना मंगळाच्या स्थितीमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला मुलांशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही अनावश्यक खर्चाने त्रस्त व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला गुप्त शत्रूंपासून सावध रहावं लागणार आहे.

सिंह रास

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ग्रहांच्या गोचरमुळे या राशीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांच्या तब्येतीची थोडी काळजी करू शकता. या काळात कोणत्याही प्रकारचा प्रवास करताना काळजी घेणं गरजेचं आहे. कुटुंबामध्ये काही कलह होऊ शकतात.

मिथुन रास

या राशीच्या लोकांनी ऑक्टोबर महिन्यात थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या आरोग्यावर काही विपरीत परिणाम होऊ शकतात. बिझनेसमध्ये तुमचं नुकसान होण्याची चिन्ह आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तळोजा परिसरात १ कोटींचे अमली पदार्थ जप्त, २ जणांना अटक

Sambhajinagar Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Viral Video: लग्नातील बुफे सोडून मॅगीवर तुटून पडले पाहुणे; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त निर्णय; सचिन तेंडुलकरला बाद ठरवून चूक केली, अंपायर स्टीव्ह बकनरला २२ वर्षांनी पश्चाताप

Accident CCTV Video: बाईक घसरली अन् डोकं थेट डंपरच्या चाकाखाली, कल्याण–मुरबाड रोडवर भयंकर अपघात

SCROLL FOR NEXT