शनि मीन राशीत प्रवेश करणार, प्रत्येक राशीवर होणार परिणाम, यांनी जास्त सावधगिरी बाळगावी Saam Tv
राशिभविष्य

Saturn Transit: शनि मीन राशीत प्रवेश करणार, प्रत्येक राशीवर होणार परिणाम, यांनी जास्त सावधगिरी बाळगावी

Saturn In Pisces: शनिचे मीन राशीत भ्रमण करणे अनेक राशींच्या जीवनात अशांतता निर्माण करू शकते. त्यामुळे कोणत्या राशींना विशेष काळजी घ्यावी लागेल ते जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शनिदेव महाराज आपली राशी बदलणार आहेत

मार्च महिन्यात न्याय देवता शनिदेव महाराज आपली राशी बदलणार आहेत. मार्च महिन्याच्या शेवटी शनीचा राशी परिवर्तन होणार आहे. २९ मार्चला शनि कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. ३ जून २०२७ पर्यंत शनि मीन राशीत राहिल.

शनिचे मीन राशीत भ्रमण करणार

शनिचे मीन राशीत भ्रमण करणे अनेक राशींच्या जीवनात अशांतता निर्माण करू शकते. त्यामुळे कोणत्या राशींना विशेष काळजी घ्यावी लागेल ते जाणून घेऊया.

शनीची साडेसाती सुरू होईल ती मेष राशींच्या लोकांवर

शनीची साडेसाती सुरू होईल ती मेष राशींच्या लोकांवर. यासाठी मेष राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी. तसेच नोकरी आणि करिअरच्या बाबतीत खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

२९ मार्च नंतर सिंह राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी

२९ मार्च नंतर सिंह राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी. या राशिच्या लोकांवर धैया सुरू होत आहे. या संपूर्ण कालखंडात सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा, तसेच आरोग्याची काळजी घ्या.

धनु राशीच्या लोकांसाठी २९ मार्च नंतर शनीचा धैया सुरू होणार

धनु राशीच्या लोकांसाठी २९ मार्च नंतर शनीचा धैया सुरू होणार आहे. धनु राशीच्या लोकांना या काळात उत्पन्न मिळवण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. या राशीच्या लोकांना मानसिक तणावाचाही सामणा करावा लागू शकतो. या काळात रागावर नियंत्रण ठेवा.

मीन राशीच्या लोकांनी शनीच्या संक्रमणाबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक

मीन राशीच्या लोकांनी शनीच्या संक्रमणाबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक असणार आहे. मीन राशीच्या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकणच्या विधान परिषद निवडणुकीत सुनील तटकरेच धुरंधर ठरण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana : सर्वात मोठी अपडेट! तब्बल ८० लाख लाडकीचा लाभ बंद, योजनेसाठी अर्जाची पुन्हा नोंदणी सुरू होणार का?

FYJC Admission 2026: अकरावी प्रवेशासाठी मोठा निर्णय! गुणपत्रक अन् शाळा सोडल्याचा दाखला नसतानाही मिळणार प्रवेश

Mumbai Rain Alert : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, 'या' शहरांना यलो अलर्ट जारी; वाचा हवामानाचा अंदाज

Famous Actress : एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आता रस्त्यावर मागतेय भीक, फोटो पाहून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT