Horoscope in Marathi Saam tv
राशिभविष्य

धावपळ होईल, मन प्रसन्न राहील; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात घडणार चमत्कार

horoscope wednesday : काही राशींच्या लोकांचं मन प्रसन्न राहील. काहींच्या आयुष्यात चमत्कार घडेल.

Saam Tv

मेष : दिवस धावपळीचा ठरेल. काम वेळेत पूर्ण करण्याचा दबाव राहील. ऑफिसमध्ये सकाळपासून ताणतणावाचं वातावरण राहील. परंतु सायंकाळपर्यंत परिस्थिती ठीक होईल.

वृषभ : मन शांत राहील. तुमचे रखडलेले कामे हळूहळू पूर्ण होतील. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा योग येईल.

मिथुन : छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येऊ शकतो. कामावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. कार्यालयात नवीन जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

कर्क : आज दिवस सामान्य राहील. कुटुंबातील एका सदस्याची चिंता सतावेल. हॉटेलमधील जेवण खाणे टाळावे.

सिंह : आत्मविश्वास वाढेल. जुने कामे पूर्ण झाल्याने दिलासा मिळाला. नोकरी आणि व्यवसायात फायदा मिळू शकतो. कुटुंबात आनंदी वातारण राहील.

कन्या : ऑफिसमध्ये जबाबदारी वाढू शकते. ऑफिसमध्ये कामाचा ताण राहील. कुटुंबातील सदस्यांचा सहकार्य फायदेशीर ठरेल.

तुला : दिवसभरात घाईघाईत निर्णय घेणे टाळावे. कामाचा ताण अधिक राहील. खास मित्रांची म0दत मिळेल .

वृश्चिक : आज नव्या कार्याला सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे. मित्रांसोबत वेळ घालवाल. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी संधी मिळेल.

धनु : रखडलेले पैसे पुन्हा मिळण्याचे संकेत आहे. घरात बऱ्याच दिवसानंतर आनंदी वातावरण राहील. जुन्या मित्रांशी अचानक बोलणे होईल.

मकर : ऑफिसमध्ये जास्त मेहनत करावी लागेल. कोणाचंही बोलणं मनावर घेऊ नये. विदेशात प्रवासासाठी योग आहे.

कुंभ : अविवाहित लोकांना विवाहासाठी प्रस्ताव येण्यास सुरुवात होईल. गोड पदार्थ खाण्याची संधी मिळेल. पार्टनरशी योग्य भाषेत बोलल्यास नाते सुधारेल.

मीन : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जुन्या नातेवाईकांची अचानक भेट होऊ शकते. ६ अंक आज शुभ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Disclaimer : लेखातील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Trekking Places: मान्सूनमध्ये ट्रेकिंगचा प्लॅन करताय? मग, मुंबई पुण्याजवळील 'या' ७ किल्ल्यांना नक्की भेट द्या

EPF update: इन हँड सॅलरी वाढणार, पीएफ नियम बदलले; कोणाला कसा फायदा होणार? जाणून घ्या

Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारने २ वर्षीय श्रृतिकाला चिरडलं, डॉक्टरविरोधात गुन्हा; थरारक VIDEO समोर

Maharashtra News Live Update: रायगडच्या दरी-डोंगरांत धबधबे प्रवाहीत; पर्यटनाला सुरुवात

Live Location Sharing : WhatsApp, Instagram वर तुम्हीही शोधू शकता मित्रांचे लाइव्ह लोकेशन; जाणून घ्या या सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT