Budhaditya Rajyog 2025 saam tv
राशिभविष्य

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Budhaditya Rajyog In Kanya: वैदिक ज्योतिषानुसार, जेव्हा दोन किंवा अधिक ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा राजयोग तयार होतो. जेव्हा ग्रहांचा राजा सूर्य आणि राजकुमार बुध एकाच राशीत येतात, तेव्हा बुधादित्य राजयोग तयार होतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक काळाने एकमेकांच्या सोबत येतात. याला ‘युती’ म्हणतात आणि याचा थेट परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो. अनेकदा याचा परिणाम देशातील घडामोडींवरही होतो. येत्या काही दिवसांत बुध आणि सूर्याची युती होऊन ‘बुधादित्य राजयोग’ तयार होणार आहे.

सूर्य १७ सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार असून बुध १५ सप्टेंबर रोजीच कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दोन ग्रहांच्या संगतीने तयार होणारा हा योग काही राशींना प्रचंड यश मिळवून देणार आहे. करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती होईल. त्याचप्रमाणे उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे.

कन्या रास

कन्या राशींसाठी बुधादित्य राजयोग अत्यंत सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. हा योग तुमच्या पहिल्याच भावात तयार होत असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. मान-सन्मानात भर पडणार आहे. पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची साथ लाभेल.

मकर रास

मकर राशींसाठी हा योग भाग्यवृद्धीचा काळ ठरणार आहे. कारण बुधादित्य राजयोग तुमच्या नवव्या भावात आणि परदेशसंबंधित स्थानी तयार होणार आहे. या काळात अचानक भाग्योदय होईल. धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसच्या कामानिमित्त लांब पल्ल्याच्या प्रवासाची संधी मिळणार आहे.

धनु रास

धनु राशीसाठी हा योग विशेष फलदायी ठरेल. कारण बुधादित्य राजयोग तुमच्या दहाव्या भावात तयार होतोय. जो कर्म आणि करिअरशी संबंधित आहे. या काळात कामधंद्यात प्रगती होईल. करिअरशी निगडित ताणतणाव कमी होणार आहे. नोकरीत वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचाही पाठिंबा लाभणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोमवारी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी करा हे 4 सोपे उपाय

Marathi Actor : मराठमोळ्या अभिनेत्याला मातृशोक; कर्करोगाशी झुंज अपयशी, सुनेने शेअर केली भावुक पोस्ट

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीच ठरलं! काँग्रेस, शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार

Accident: समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा

Heart attack symptoms: सकाळी बेडवरून उठताच ही ६ लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे; वेळीच डॉक्टरांची घ्या मदत

SCROLL FOR NEXT