Budh Gochar In Mithun saam tv
राशिभविष्य

Budh Gochar : ६ जूनपासून या ३ राशींना लागणार लॉटरी; बुध ग्रह मिळवून देणार पैसा

Budh Gochar In Mithun: बुधाच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. जून महिन्यात बुध ग्रह होचर करणार असून यावेळी कोणत्या ३ राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये बुध ग्रह सुमारे ३० दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. मुळात बुध ग्रह व्यवसाय, शेअर बाजार, अर्थव्यवस्था यांचा कारक मानला जातो. त्यामुळे बुध ग्रहाच्या स्थितीतील या सर्व क्षेत्रांवर परिणाम करतो.

ग्रहांचा राजकुमार बुध ६ जून रोजी आपल्या राशी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशींना आर्थिक लाभ आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे याशिवाय शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा होऊ शकतो. यावेळी कोणत्या राशींना फायदा मिळणार आहे ते पाहूयात.

मीन रास

बुध ग्रहाचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. हे गोचर तुमच्या राशीच्या सुख आणि संपत्तीच्या घरावर होणार आहे. या वेळी तुम्हाला भौतिक सुख मिळू शकणार आहे. कौटुंबिक जीवनातही आनंद राहण्याची शक्यता आहे. नात्यात गोडवा वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या करिअरशी संबंधित नवीन योजना राबवू शकणार आहात.

सिंह रास

बुध ग्रहाचे भ्रमण तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. कारण बुध ग्रह तुमच्या गोचर कुंडलीच्या उत्पन्न आणि लाभ स्थानात भ्रमण करणार आहे. तुमच्या राशीच्या धन स्थानाचा स्वामी बुध ग्रह देखील आहे. या काळात तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे मिळू शकणार आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत.

कन्या रास

बुध ग्रहाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून कर्म घरात गोचर करणार आहे. या वेळी तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकणार आहेत. व्यावसायिकांसाठी हा फायदेशीर काळ आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT