Budh Gochar 2024 saam tv
राशिभविष्य

Budh Gochar 2024 : बुध गोचरमुळे २१ दिवस 'या' राशींनी रहावं सतर्क; आर्थिक तंगी-आजारपण पाठ सोडणार नाही!

Budh Gochar 2024 : सप्टेंबर महिन्यात बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. बुध ग्रहाचं हे गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी धोकादायक असणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. दर महिन्याला ग्रहांचं गोचर होत असतं. सप्टेंबर महिन्यात बुध ग्रहाचं गोचर होणार आहे. आज म्हणजेच बुधवारी बुध ग्रहाने गोचर केलं आहे. या वेळी बुधाने सिंह राशीमध्ये प्रवेश केला असून तो २३ सप्टेंबरपर्यंत या राशीत राहणार आहे.

दरम्यान बुध ग्रहाचं हे गोचर प्रत्येक राशीवर काही ना काही परिणाम करणार आहे. या काळात काही राशींना सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. बुधाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या व्यक्तींना या काळात सतर्क राहावं लागणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी कठीण दिवस येणार आहेत.

कन्या रास

बुध ग्रहाचं गोचर या राशींच्या व्यक्तींसाठी फायदेशीर नसणार आहे. एखाद्या मोठ्या प्रकरणात तुम्ही गुंतण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांकडून त्रास होऊ शकतो. वाहन चालवताना काळजी घ्यावी. मानसिक आरोग्याचा सामना करावा लागू शकतो.

धनु रास

या काळात धनु राशींच्या व्यक्तींना नशीबाची साथ मिळणार नाहीये. तुमचा इतरांसोबत मोठा वाद होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागू शकते. जर कोणाला तुम्ही वचन दिलं असेल तर ते पूर्ण कराल. अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांना अडथळ्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

मीन रास

बुधाच्या गोचरचा तुमच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती खालावण्याची शक्यता आहे. व्यापारामध्ये नुकसान होऊ शकतं.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly fat: पोटाच्या कोणत्या भागावर चरबी साचतेय? तज्ज्ञांनी सांगितलं कोणत्या गंभीर आजारांचा असू शकतो हा मोठा इशारा

Maharashtra News Live Update: अमित शहांच्या दौऱ्यावरून भाजप-काँग्रेस आमने सामने

Face soap: दररोज चेहऱ्याला साबण लावल्यास काय होतं?

अरे बापरे! लग्नाच्या २५ दिवसांनंतर पत्नी दाढी करताना दिसली अन् पतीच्या पायाखालची जमीनच सरकली, पुढे काय घडलं?

Mumbai News: स्कॉर्पिओ नको, इनोव्हा हवी! BMC मध्ये महागड्या गाड्यांची उधळपट्टी, वाहन खरेदीवरून राजकारण तापले

SCROLL FOR NEXT