Bhadra Rajyog 
राशिभविष्य

Bhadra Rajyog: बुध ग्रहाच्या गोचरमुळे बनणार भद्र राजयोग; 'या' राशींचं नशीब उजळणार

Bhadra Rajyog In Kundli: ग्रहांच्या गोचरमुळे एक खास राजयोग तयार होणार आहे. सप्टेंबरमध्ये हा राजयोग तयार होणार असून यावेळी काही राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ मिळू शकणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bhadra Rajyog In Kundli: ग्रहांच्या गोचरमुळे एक खास राजयोग तयार होणार आहे. सप्टेंबरमध्ये हा राजयोग तयार होणार असून यावेळी काही राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ मिळू शकणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग देखील तयार होतात. असंच येत्या महिन्यात बुध ग्रहाच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होणार आहे.

सप्टेंबर महिन्यात बुध ग्रह स्वतःच्या राशीत कन्या राशीत भ्रमण करणार आहे. त्यामुळे भद्र राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे सर्व राशींच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे. मात्र काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या भद्र राजयोगाचा चांगला परिणाम मिळणार आहे.

मकर रास (Makar Zodiac)

भद्र राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य आणि आर्थिक लाभ मिळेल. या काळात तुम्ही भाग्यवान ठरू शकता. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. यावेळी तुम्ही केलेल्या सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

धनु रास (Dhanu Zodiac)

भद्रा राजयोग तयार झाल्यामुळे धनु राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. तुम्ही जोडीदारासोबत खूप समाधानी आणि आनंदी दिसाल. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळू शकणार आहे.

कन्या रास (Kanya Zodiac)

भद्र राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या राजयोगामुळे करिअरच्या दृष्टिकोनातून प्रगतीसोबतच पगार वाढण्याचीही शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होईल. व्यवसायाच्या आघाडीवर, तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगलं उत्पन्न मिळू शकतं. तुमची सर्व उद्दिष्टे साध्य करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT