Grah Gochar 2024 saam tv
राशिभविष्य

Grah Gochar 2024: ३० सप्टेंबरपूर्वी 'या' राशींच्या तिजोरी वाढणार धन-संपत्ती; 4 राजयोग करणार मालामाल

Grah Gochar 2024: सप्टेंबर महिन्यात बुधादित्य योग, शुक्रादित्य योग, लक्ष्मी नारायण योग आणि शश राजयोग तयार होणार आहे. यामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत, ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये, प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. हे नऊ ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशीमध्ये परिवर्तन करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास शुभ आणि अशुभ राजयोग तयार होतात. ज्यांचा प्रभाव बाराही राशींच्या व्यक्तींवर होत असतो.

हिंदू पंचांगानुसार, ४ सप्टेंबर २०२४ ला बुध बुध ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केलाय. त्यानंतर 18 सप्टेंबरला शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यापूर्वी 16 सप्टेंबर 2024 रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्यात मोठ्या ग्रहांनी त्यांच्या राशीमध्ये बदल केल्याचं दिसतंय.

शास्त्रानुसार, या 3 ग्रहांच्या राशी बदलामुळे बुधादित्य योग, शुक्रादित्य योग, लक्ष्मी नारायण योग आणि शश राजयोग तयार होणार आहे. या चार राजयोगांचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर दिसून येणार आहे. जाणून घेऊया हे योग कोणत्या राशींच्या व्यक्तींना मालामाल करणार आहेत.

मिथुन रास

बुधादित्य योग, शुक्रादित्य योग, लक्ष्मी नारायण योग आणि शश राजयोग यांच्या निर्मितीमुळे या राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहेत. तरूणांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही नव्या लोकांना भेटू शकणार आहात. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क रास

सप्टेंबर महिन्यात तयार होणारे चार राजयोग या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहेत. व्यापारात तुम्हाला प्रचंड पैसा कमावता येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. येत्या काळात तुम्हाला एक चांगली गोष्ट समजणार आहे.

कन्या रास

३० सप्टेंबरपूर्वी या राशींच्या लोकांना काहीतरी गोड बातमी मिळणार आहे. तुमच्या मनात असलेली प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करू शकता. विदेशात फिरण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकतं. कोणतं आजारपण तुमच्या मागे असेल ते दूर होऊ शकणार आहे. कुटुंबामधील व्यक्तीला अचानक चांगली बातमी मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: धुक्याची चादर, डोंगररांगा आणि रोमँटिक वातावरणात वेळ घालवायचाय? पाहा महाराष्ट्रातील कपल्ससाठी बेस्ट स्पॉट्स

Rohit Arya Encounter: रोहित आर्याच्या एन्काऊंटरबाबत पोलीस फिर्यादीतून धक्कादायक खुलासा

दिवाळीचं फराळ खाऊन पोट सुटलंय? भाग्यश्रीनं सांगितलं वेट लॉस कॉफी रेसिपी, वजन झरझर घटेल

Maharashtra Live News Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील घेणार डॉक्टर महिला कुटुंबीयांची भेट

Tulsi Vivah Upay For Marriage: तुळशी विवाहच्या दिवशी करा सोपे उपाय, विवाह जुळतील

SCROLL FOR NEXT