Budh Surya Yuti saam tv
राशिभविष्य

Budh Surya Yuti: 13 फेब्रुवारीपूर्वी 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; उत्पन्नात होणार प्रचंड वाढ

Budh Surya Yuti 2025: ११ फेब्रुवारी रोजी पहाटे १२:५८ वाजता बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी १२ फेब्रुवारी रोजी रात्री १०:०३ वाजता सूर्य कुंभ राशीत गोचर करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतरानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होत असतात. ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा राजकुमार बुध एकाच राशीत स्थित आहे. ज्यामुळे १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होत आहेत.

सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह मकर राशीत आहेत. ११ फेब्रुवारी रोजी पहाटे १२:५८ वाजता बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी १२ फेब्रुवारी रोजी रात्री १०:०३ वाजता सूर्य कुंभ राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे कुंभ राशीत या दोन्ही ग्रहांची युती होणार आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि बुध यांची युती फायदेशीर ठरणार आहे. १३ फेब्रुवारीपूर्वी जीवनात काही बदल होऊ शकतात. तुम्हाला धार्मिक कार्यात रस असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे समाजात तुमची ओळख निर्माण होणार आहे. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी बुध आणि सूर्याची युती फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्यांना तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. तुमच्या विचारांमध्ये बदल होऊ शकतो. आर्थिक जीवनात स्थिरता येणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी बुध आणि सूर्याची युती चांगली राहणार आहे. तुम्ही नातेवाईकांना भेटू शकता. सामाजिक कार्यात तुमची आवड वाढणार आहे. संबंध पूर्वीपेक्षा चांगले होणार आहेत. जोडीदाराशी संबंध सुधारतील आणि प्रेम वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दसरा मेळाव्यात आरक्षणाचं शस्त्रं पूजन, हैदराबाद गॅझेटियरला मुंडेंचा विरोध?

Kolhapur Election: कोल्हापूर महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? महायुती की मविआ, कुणाची जादू चालणार?

Sweets: जास्त प्रमाणात गोड खाणं डोळ्यांसाठी हानिकारक? काय होतो परिणाम

Friday Horoscope : पार्टनरशी चांगलं बॉण्डिंग होणार; ५ राशींच्या लोकांचे प्रेमाचे अडथळे दूर होणार

RSS: दसऱ्याच्या दिवशीच संघाच्या शाखेवर मोठी कारवाई; 39 स्वयंसेवक ताब्यात, काय आहे कारण, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT