Conjunction Of Shani And Budh saam tv
राशिभविष्य

Ashtadasha Yog: शनी-बुध ग्रहामुळे तयार होणार अष्टादश योग; 'या' राशींना लागणार लॉटरी

Conjunction Of Shani And Budh 2025: ग्रहांनी बदलेल्या स्थितीचा प्रत्येक राशींच्या जीवनावर परिणाम होत असतो. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी बुध आणि शनि एकमेकांपासून १८ अंशांच्या कोनीय स्थितीत असणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये भ्रमण करतात. याला ग्रहांचं गोचर मानलं जातं. ग्रहांच्या या राशी भ्रमणामुळे अनेक राजयोग निर्माण होतात. मे महिना हा ग्रहांच्या हिशोबाने फार महत्त्वाचा आहे. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी दोन ग्रहांची युती होणार आहे.

१ मे २०२५ रोजी बुध आणि शनि एकमेकांपासून १८ अंशांच्या कोनीय स्थितीत असणार आहे. शनी आणि बुध ग्रहाच्या या स्थितीमुळे अष्टदश योग तयार होणार आहे. या योगाच्या प्रभावामुळे ३ राशीच्या व्यक्तींना लॉटरी लागणार आहे. यामध्ये कोणत्या राशी आहेत त्यावर एक नजर टाकूयात.

मकर रास

शनि आणि बुध ग्रहाची युती तुमच्यासाठी लकी ठरू शकणार आहे. तुमचं आर्थिक नियोजन सुधारणार असून तुमच्या हातात खूप पैसे येणार आहेत. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. बँकींग क्षेत्रात असलेल्या व्यक्ती प्रगतीकडे वाटचाल करू शकतात. अविवाहित लोकांसाठी नातं लवकरच निर्माण होणार आहे.

मिथुन रास

शनि आणि बुध ग्रहाची युती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते. या काळात नोकरीत प्रगतीची संधी मिळणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वय राहण्याची शक्यता आहे. घरात शांती आणि आनंद राहणार आहे. या काळात बेरोजगारांना नोकरी मिळू शकते.

वृषभ रास

शनि आणि बुध ग्रहाचा अष्टदश योग तुम्हाला खूप पैसे मिळवून देणार आहे. बिझनेसच्या कामातही तुम्हाला फायदा होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी हा मजबूत काळ आहे. गुंतवणुकीमुळे चांगला परतावा मिळणरा आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahi Tukda Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा

Maharashtra News Live Update: खेडमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार; तिघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

Sanju Samson : भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान संजू सॅमसनचा मोठा निर्णय; अचानक स्पर्धेतून नाव घेतलं मागे; सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

भीषण अपघात! कार दरीत कोसळली, वाहन बाहेर काढताच आतमध्ये असलेलं घबाड पाहून पोलीसही चक्रावले

Maharashtra politics : ठाकरेंनंतर पवारांना धक्का? ६ खासदार अस्वस्थ, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT